जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप सुरु, एका सेकंदात 28 GB माहिती करतो गोळा

बीजिंग : वृत्तसंस्था – टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चीन अग्रेसर असलेल्या देशांपैकी एक आहे. आता चीनमध्ये सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप तयार करण्यात आला आहे. हा टेलिस्कोप इतका मोठा आहे की त्याची चाचणी घेण्यासाठीच तीन वर्षांचा कालावधी गेला. २०१६ पासून त्याची चाचणीच घेण्यात येत होती. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गगनचुंबी इमारती काही महिन्यांत बनवणाऱ्या चीनला हा टेलिस्कोप बनवण्यासाठी तब्बल २० वर्षांचा कालावधी लागला. हा टेलिस्कोप चीनमधल्या गेईझोऊ प्रांतात आहे. आता हा टेलिस्कोप जगभरातील खगोल शास्त्रज्ञांसाठी खुला करण्यात आला आहे.

काय आहेत सर्वात मोठ्या टेलिस्कोपची वैशिष्ट्ये

१) हा टेलिस्कोप प्युर्टोरिकाच्या अबेसिरो ऑब्झरव्हेटरी पेक्षा २.५ पटींनी संवेदनशील आहे. जो की जगातील दुसरा मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे.

२) चीनचा हा टेलिस्कोप एका सेकंदात २८ जिबी माहिती गोळा करू शकतो. म्हणूनच त्याला ५०० मीटर अपार्चर स्पेरिकल रेडिओ टेलिस्कोप(फास्ट ) असे नाव देण्यात आले आहे.

३) याची अंतराळातील रेंज चार पटींनी अधिक आहे.

४) या टेलिस्कोपने आतापर्यंत ४४ पल्सरचा शोध लावला आहे. (पल्सर हा वेगाने फिरणारा एक न्यूट्रॉन किंवा तारा आहे. जो रेडिओ लहरी आणि विद्द्युत चुंबकीय विकिरण उत्सर्जित करतो.)

५) या टेलिस्कोपच्या ५ कि.मी.च्या परिघामध्ये कोणतेही शहर नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/