Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | मुस्लिम कुटुंबाने सर्वात मोठ्या मंदिराला दान केली 2.5 कोटी रूपयांची जमीन

पटणा : वृत्तसंस्था – Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | देशात जातीय सलोख्याचे उदाहरण मांडत बिहार (Bihar) मधील एका मुस्लिम कुटुंबा (Muslim Family) ने पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात उभारले जात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी (World’s Largest Temple) अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे (Virat Ramayan Mandir). पटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, ही जमीन गुवाहाटी येथे राहणारे पूर्व चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे. (Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir)

 

माजी आयपीएस अधिकारी कुणाल म्हणाले, त्यांनी अलीकडेच पूर्व चंपारणमधील केसरिया उपविभागाच्या निबंधक कार्यालयात मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाच्या मालकीची जमीन दान करण्यासंबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या.

 

दोन समाजातील सौहार्दाचे उदाहरण
आचार्य किशोर कुणाल म्हणाले की, इश्तियाक अहमद खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी सामाजिक सलोखा आणि दोन समाजातील बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असे ते म्हणाले.

 

मंदिराच्या उभारणीसाठी 125 एकर जागा
ते म्हणाले की, महावीर मंदिर ट्रस्टला या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 125 एकर जमीन मिळाली आहे.
ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जागा मिळणार आहे.

विराट रामायण मंदिर कंबोडियातील 12 व्या शतकातील जगप्रसिद्ध अंकोरवाट परिसरापेक्षा उंच असेल, जे 215 फूट उंच आहे.
पूर्व चंपारणच्या परिसरात उंच शिखरांसह 18 मंदिरे असतील आणि त्याच्या शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल.
एकूण बांधकाम खर्च अंदाजे 500 कोटी रुपये आहे. ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या तज्ञांचा सल्ला घेणार आहे.

 

Web Title :- Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | muslim family donated two and half crore rupees land for worlds largest temple virat ramayan mandir in bihar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Card : चुकीचे नाव असो किंवा जन्म तारीख, मिनिटात बदलू शकता; अपडेट करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

 

Pune Crime | सोसायटीतील वाद ! 60 वर्षाच्या गृहस्थाने शेजार्‍यावर चक्क केला खुनी हल्ला

 

Pune Crime | पुण्यात सावत्र बापच बनला नराधम ! 16 वर्षाच्या मुलीला धमकावून केला वारंवार बलात्कार