जाणून घ्या ‘या’ 4.5 लाख रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनमध्ये आहे तरी नेमकं काय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कमीत कमी तीन iPhone 11 Pro Max खरेदी करता येतील अशा महागड्या स्मार्टफोनची बाजारात ग्रँड एन्ट्री झाली आहे. या स्मार्टफोनचे नाव 8848 M6 Private Customised Dragon Limited Edition असे आहे. त्याची किंमत तब्बल ४४०० अमेरिकी डॉलर म्हणजेच ३ लाख २४ हजार ५०० रुपये आहे. तर फोनच्या टॉप मॉडेलची किंमत ५ लाख रुपये आहे.

३ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा स्मार्टफोन
8848 एक चायनीज लग्झरी स्मार्टफोन ब्रँड आहे. त्याला नुकतेच एम ६ लग्झरी स्मार्टफोनच्या किंमतीत बाजारात आणले आहे. फोन तीन मॉडेलमध्ये मिळतो. पहिल्या मॉडेलचे नाव Vermilion Cowhide or Azurite Leather असे आहे. हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसोबत उपलब्ध होतो. याच्या डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड टायटेनियम अलॉयचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबत याला खास लूक मिळण्यासाठी नॅचरल डायमंड आणि येलो सफायर सिंथेटिक रुबीचा टच दिला आहे. याची किंमत ४४०० डॉलर म्हणजेच ३ लाख २४ हजार ५०० रुपये आहे.

दुसऱ्या मॉडेलची किंमत ४ लाख रुपये
Blue Dragon Lizard Skin या नावाने दुसरा स्मार्टफोन आहे. याच्या डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड टायटेनिअम अलॉयडचा वापर करण्यात आला आहे. या फोनचे व्हेरियंट १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येते. याची किंमत ५२७४ डॉलर म्हणजेच ३ लाख ८९ हजार रुपये आहे.

तिसऱ्या मॉडेलची किंमत ४.८६ लाख रुपये
क्रोकोडायल लेदर व्हेरियंटची हा 8848 M6 प्राइवेट कस्टमाइज्ड ड्रॅगन लिमिटेड एडिशनचा सर्वात महाग स्मार्टफोन आहे. याची किंमत तब्बल ६६० डॉलर म्हणजेच ४ लाख ८६ हजार ६०० रुपये आहे. यामध्ये १२ जीबी रॅम आणि १ टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.

स्मार्टफोनमधील इतर फीचर्स
फोनमध्ये ६.०१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोटोसाठी यामध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० आउट ऑफ द बॉक्सवर काम करत असून, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ एसओसी प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4,380mAh बॅटरी बॅकअप दिलं आहे. तर २७ वॉट वायरलेस आणि १० वॉटची वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे.