काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आतापर्यंत तुम्ही सोने, चंदन, ड्रग्स, प्राण्यांची कातडी अशा गोष्टींची तस्करी होत असल्याचे अनेकदा ऐकल, वाचलं असेल. पण कधी बेडकाचीही तस्करी होते असे तुम्ही कधी ऐकल नसेल. मात्र विषारी बेडकाची तस्करी जगभरात होते. या बेडकामध्ये इतके विष असते की, 10 लोकांचा जीव घेता येतो. या खास प्रजातीच्या बेडकाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 हजार डॉलर म्हणजे दीड लाख रुपये मोजावे लागतात. चला तर मग जाणून घ्या, कोणता आहे बेडूक, का होते तस्करी.

पॉयजन डार्ट बेडूक असे या बेडकाच्या प्रजातीचे नाव असून हे प्रामुख्याने बोलिविया, कोस्टारिया, ब्राझील कोलंबिया, इक्वाडोर, व्हेनिझुएला, सूरीनाम, फ्रेंच गुएना, पेरू, पनामा, गुयाना, निकारागुआ आणि हवाईच्या जंगलात आढळतात. हे बेडूक पिवळ्या, काळ्या तर काही हिरवे-चमकदार नारंगी रंगाचे आणि काही निळे-काळ्या रंगाचे असतात. या बेडकातील विषामुळे याची तस्करी केली जाते. पॉयजन डार्ट बेडकाचे 424 छोटे बेडूक नुकतेच बगोटा येथील अल-डोराडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर एका प्रवाशाच्या बॅगेत सापडले होते. यातील प्रत्येकी एका बेडकाची किंमत 2000 डॉलर म्हणजे दीड लाख रुपये इतकी आहे.

जर्मनीच्या एका वैज्ञानिकाचे म्हणणे आहे की, कोलंबियामध्ये 200 एंफीबियंस म्हणजे उभयचर प्राण्यांना लुप्त होणारे प्राणी म्हणून घोषित केले आहे. ज्यात या बेडकांचाही समावेश आहे. या बेडकांचा रंग आणि त्याचे विष त्यांना बहुमूल्य बनवते. या बेडकांना वाचवण्याचा प्रयत्न 16 वर्षांपासून होत आहे. पण यांची तस्करी कमी होत नाही.

2011 मध्ये ब्रीडिंगमधून पिवळ्या पॉयजन डार्ट बेडकांची लीगल एक्सपोर्टला परवानगी मिळाली आहे. 2015 मध्ये याच प्रजातीशी मिळत्या जुळत्या तीन प्रजातींना अशीच परवानगी मिळाली आहे. हे बेडूक अमेरिका, यूरोप आणि आशियात पाठवले जातात. 2014 ते 2017 दरम्यान अमेरिकेत मागवलेल्या बेडकांपैकी सर्वात जास्त भाग हा पॉयजन डार्ट बेकडांचा होता. या बेडकांच्या विषाचा वापर औषधांमध्ये केला जातो. या विषाने पेनकिलर औषधे तयार केली जातात.