जगातील ‘हे’ 5 नेते सर्वात श्रीमंत ! जेफ बोजेस आणि बिल गेट्स देखील नाहीत त्यांच्यापुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिकांबाबत तर तुम्हाला माहीतच असेल परंतु तुम्हाला असे नेते माहिती आहेत का ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. आज आपण जगातील अशा गर्भश्रीमंत पाच नेत्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) फिलीपींसमध्ये 1965 ते 1986 दरम्यान राज्य करणारे फर्डिनेंड मार्कोस यांची गिनती जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते. त्यांची एकूण संपत्ती 3.80 लाख कोटी रुपये इतकी आहे.

2) इंडोनेशियामध्ये 1968 ते 1998 दरम्यान सुहारतो यांची सत्ता होती. सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ऐकून संपत्ती 3.95 लाख कोटी रुपये इतकी होती.

3) 1990 ते 2012 या कालावधीमध्ये यमनमध्ये राज करणारा अली अब्दुल्ला सालेह हा सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक होता. त्याची ऐकून संपत्ती 4.59 लाख कोटींपेक्षा अधिक होती.

4) इतिहासातील दुसरा सर्वात श्रीमंत नेता मिस्रशी निगडित होता. त्याचे नाव होस्नी मुबारक असे होते त्याने 1981 ते 2011 या कालखंडात राज्य केले त्याची एकूण संपत्ती पाच लाख कोटी इतकी होती.

5) जगातील सर्वात श्रीमंत नेता हा लिबियातील मुअम्मर गद्दाफी होता. 1977 ते 2011 पर्यंत राज करणारा गद्दाफी एकूण 14 लाख कोटींपेक्षा अधिक संपत्तीचा मालक होता.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like