‘हे’ जगातील एकमेव हिंदू शेख, ओमानचे सुल्तान गरज भासल्यास मागायचे त्यांच्याकडे पैसे

मस्कट : वृत्तसंस्था – ओमानचे सुल्तान काबूस बिन सईद यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शनिवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ब्रिटनच्या समर्थानाने 1970 मध्ये काबूस आपल्या वडिलांना गादीवरून हटवून स्वत: सुल्तान झाले होते. तेलापासून होणाऱ्या उत्पन्नचा वापर त्यांनी ओमानच्या विकासासाठी केला. परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, खाडी देश ओमानमध्ये राहणारे कनकशी खिमजीभाई जगातील एकमेव हिंदू शेख आहेत. कनकशीभाई ओमानमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी आहेत. त्यांच्या कुटुंबाचं ओमानसोबत 150 वर्ष जुनं नातं आहे.

जाणून घेऊयात कनकभाईंबद्दल काही गोष्टी
कनकभाई मूळचे गुजरातमधील कच्छचे आहेत. ते वैष्णव संप्रदायाचे आहेत. त्यांच्या कंपनीचं नाव रामदास ग्रुप ऑफ कपंनीज आहे. त्यांना ओमानचे सुल्तान काबूस बिन सईद यांनी शेख ही मानद उपाधी दिली होती. ते जगातील एकमेव हिंदू शेख आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील मोठ्या बंदरांवर वेगाने माल पोहोचवण्यासाठी कनकभाईंचे पंजोबा रामदास ठाकरशी हे 1870 मध्ये मांडवी कच्छमधून ओमानच्या सूर नावाच्या ठिकाणी स्थायिक झाले.

ते भारतातून धान्य, चहा, मिरची-मसाला नेऊन ओमानमध्ये विकत असत. तर ओमानमधून खजूर, ड्राय लाइम आणि लोभान भारतात विकत असे. ओमानची राजधानी मस्कट त्याकाळी सर्वात समृद्ध बंदर होतं. कनकभाईंचे वडिल गोकलदास आणि आजोबा खिमजी रामदास यांनी मिळून खिमजी रामदास ग्रुप ऑफ कंपनीजची स्थापना केली होती. हा ग्रुप आजच्या काळातील सर्वात मोठा बिजनेस ग्रुप बनला आहे. कनकभाईंचे आजोबा खिमजी रामदास त्याकाळी सुल्तान सईद यांना आर्थिक मदतही करत असत.

ओमानमध्ये कनकभाईंचा बोलबाला
ओमानमधील वृत्तपत्रांनुसार, सरकारी मंत्रालयात कनकभाईंचा बोलबाला आहे. त्यांचं व्यावसायिक कौशल्य पाहून ओमानचे सुल्तान खूपच प्रभावित राहिले आहेत. सुल्तानाने ओमानचा टुरिज्म बिजनेस विकसित करण्यासाठी कनकभाईंना Lo’Lo’ ही नौक भेट म्हणून दिली होती. 1960 मध्ये कनकभाईंच्या लग्नावेळी तत्कालीन सुल्तानाने त्यांना चांदीचा जग भेट म्हणून दिला होता.

कनकभाई क्रिकेटचे शौकीन
कनकभाई ओमान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि फाऊंडर आहेत. या क्रिकेट क्लबच्या वतीने ओमान आणि भारताव्यतिरीक्त पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडूही खेळतात. ओमानमध्ये क्रिकेटला पुढे नेण्यासाठी कनकभाईंनी जे योगदान दिलं आहे त्याबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने त्यांना लाईफटाईम सर्व्हीस अवॉर्ड देऊन सन्मानित केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/