हे आहे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब ; प्रतितास कमावते २८ कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेफ बेजोस चे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहे हे आपल्याला माहिती आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब दर तासाला २८ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवते. श्रीमंत कुटुंबांच्या या यादीमध्ये अंबानी कुटुंबाचाही समावेश आहे. ब्लूमबर्ग या अर्थक्षेत्राला वाहिलेल्या वृत्तपत्राने जगातील २५ श्रीमंत कुटुंबांची यादी तयार केली आहे. या कुटुंबांकडे जवळपास दीड लाख कोटी रुपये आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत पहिले स्थान ‘सुपरमार्केट वॉलमार्ट’ चालविणाऱ्या कुटुंबाचे आहे. अहवालानुसार वॉलमार्ट कुटुंब दर मिनिटाला सुमारे ५० लाख रुपये, दर तासाला सुमारे २ कोटी ४६ लाख रुपये आणि दररोज सुमारे सात अब्ज १२ कोटी रुपये कमावते.

वॉलमार्ट कुटुंबानंतर, ‘मार्स कुटुंब’ या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याची कंपनी मार्स बार्स चॉकलेट बनवते. त्याचबरोबर या यादीमध्ये फेरारी, बीएमडब्ल्यू आणि हयात हॉटेल ग्रुप चालविणाऱ्या कुटूंबाचा समावेश आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे कुटुंब या यादीत नवव्या स्थानावर आहे. अंबानी कुटुंबाचे एकूण उत्पन्न ५०.४ अब्ज म्हणजेच सुमारे ५०४०० कोटी रुपये आहे.
ambani

आरोग्यविषयक वृत्त –