Worlds Safest City | जगातील सर्वात Safe शहरांमध्ये डेन्मार्कचे Copenhagen पहिल्या नंबरवर, जाणून घ्या दिल्ली अन् मुंबईचा नंबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Worlds Safest City | द इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स युनिट (the Economist Intelligence Unit) च्या एका स्टडीत समजले आहे की, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन (Copenhagen) जगातील सर्वात सुरक्षित शहर आहे, तर या यादीत टोरंटो (Toronto) दुसर्‍या आणि सिंगापूर (Singapore) तिसर्‍या नंबरवर येते. या यादीत जगातील 60 सुरक्षित शहरांना स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली (New Delhi) 48व्या नंबरवर आणि मुंबई (Mumbai) शहर 50व्या नंबरवर येते.

 

जाणून घ्या कोणती आहेत टॉप 10 सेफ शहरे

– कोपनहेगन (Copenhagen)

– टोरंटो (Toronto)

– सिंगापुर (Singapore)

– सिडनी (Sydney)

– टोकियो (Tokyo)

– एम्स्टर्डम (Amsterdam)

– वेलिंग्टन (Wellington)

– हाँगकाँग (Hong Kong)

– मेलबर्न (Melbourne)

– स्टॉकहोम (Stockholm)

 

कोणत्या आधारावर झाला आहे रिसर्च

EIU ने 76 मापदंडांच्या आधारावर 60 शहरांना स्थान दिले आहे. या मापदंडांमध्ये डिजिटल, हेल्थ, इन्फ्रास्ट्रक्चर, पर्सनल आणि एनव्हायरमेंट सिक्युरिटीचा समावेश आहे. या पाच मापदंडांमध्ये सर्व शहरांना शंभरपैकी वेगवेगळा स्कोअर दिली आहे. या यादीत पाकिस्तानचे कराची 59व्या स्थानावर आहे. ईआययूचे लंडनमध्ये मुख्यालय आहे.

Web Title : Worlds Safest City | according to eui denmarks copenhagen is the worlds safest city know which cities of india are safe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…

Pune Railway Police | प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत चोर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात, 4 गुन्हे उघडकीस

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी