Coronavirus : जगभरात 5800000 लोक ‘कोरोना’बाधित, 24 तासात 100000 नवे रुग्ण तर 5000 बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगातील 213 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. गेल्या 24 तासात एक लाख तीन हजार नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आणि मृतांच्या संख्येत 5,186 ची वाढ झाली आहे. तर यापूर्वी एक दिवस आधी 4,055 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत सुमारे 58 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी 3 लाख 56 हजार 840 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 24 लाख 94 हजार लोक संसर्गमुक्त झाले आहेत. जगातील सुमारे 74 टक्के कोरोनाची प्रकरणे केवळ 12 देशांतून समोर आली आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 42.70 लाख आहे.

जगात कुठे किती प्रकरणे, किती मृत्यू

जगातील एकूण प्रकरणांपैकी एक तृतीयांश अमेरिकेत नोंदवले गेले आहेत आणि जवळजवळ एक तृतीयांश मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर यूकेमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. येथे एकूण 267,240 लोकांना या विषाणूची लागण झाली असून त्यापैकी 37,460 लोकांचा मृत्यू झाला आहे. रशिया, स्पेन आणि ब्राझीलच्या तुलनेत यूकेमध्ये रूग्णांची संख्या कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण, भारत यासारख्या देशांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

अमेरिका : प्रकरण – 1,745,800, मृत्यू – 102,109

ब्राझील : प्रकरण – 411,821, मृत्यू – 25,598

रशिया : प्रकरण – 370,680, मृत्यू – 3,968

स्पेन : प्रकरण – 283,849, मृत्यू – 27,118

यूके : प्रकरण – 267,240, मृत्यू – 37,460

इटली : प्रकरण – 231,139, मृत्यू – 33,072

फ्रान्स : प्रकरण – 182,913, मृत्यू – 28,596

जर्मनी : प्रकरण – 28,596, मृत्यू – 8,533

तुर्की : प्रकरण – 159,797, मृत्यू – 4,431

भारत : प्रकरण – 158,086, मृत्यू – 4,534

12 देशांमध्ये एक लाखाहून अधिक प्रकरणे –

रशिया, ब्राझील, स्पेन, यूके, इटली येथे कोरोना प्रकरणांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. याखेरीज असे सहा देश आहेत ज्यात एक लाखाहून अधिक कोरोना प्रकरणे आहेत. अमेरिकेसह या 12 देशांमध्ये एकूण 42 लाख प्रकरणे आहेत.

अमेरिकेव्यतिरिक्त रशिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. असे सहा देश आहेत (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, यूके, ब्राझील) जिथे 25 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत मृतांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. चीन टॉप 10 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर भारत पहिल्या दहा देशांमध्ये सामील झाला आहे.