जगभरातील पासपोर्ट फक्त 4 रंगाचे, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –पासपोर्ट माणसाची अशी ओळख आणि दस्तऐवज जो नसेल तर माणूस एक देशातून दुसऱ्या देशात नाही जाऊ शकत. जरी कोणी तसं केलं तर त्याला कडक शिक्षा होऊ शकते. तुम्हाल माहिती आहे का जगात फक्त 4 रंगाचे पासपोर्ट असतात. लाल, हिरवा, निळा आणि काळा अशा प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचा अर्थ खास आणि वेगळा आहे.

1) लाल रंगाच पासपोर्ट- जास्त करून युरोपीयन देशात लाल रंगाचा पासपोर्ट वापरला जातो. यात रूस, फ्रान्स पोलंड, नेदरलँड, रोमानिया आणि जर्मनी असे देश आहेत. चीनमध्येही लाल रंगाचा पासपोर्ट वापरला जातो. ज्या देशांचा कम्युनिस्ट इतिहास राहिला आहे आणि जिथं आजही कम्युनिस्ट व्यवस्था आहे तिथं लाल रंगाचा पासपोर्ट वापरला जातो.


2) हिरव्या रंगाचा पासपोर्ट- पाकिस्तान, बांग्लादेश, इंडोनेशिया, सऊदी अरब, मोरक्को अशा इस्लामिक देशात हिरव्या रंगाचा पासपोर्ट वापरला जातो. इस्लाम धर्मा हिरवा रंग पवित्र मानला जात असल्यानं या देशाज हिरव्या रंगाचे पासपोर्ट आहेत. यात काही आफ्रिकी देशही आहेत. यात बुर्किना फासो, नायजेरिया, नायजर आणि आयवरी कोस्ट अशी काही नावं सांगता येतील. या देशात हिरव्या रंगाला निसर्गाचं आणि जीवनाचं प्रतिक मानलं जातं.

3) निळ्या रंगाचा पासपोर्ट- निळ्या रंगाला शांततेचं आणि नव्या दुनियेचं प्रतीक मानलं जातं. हेच कारण आहे की, भारतासह उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया अशा देशात निळ्या रंगाचा पासपोर्ट वापरला जातो. याशिवाय अफगाणिस्तान आणि फिजी सारख्या देशातही हलक्या निळ्या रंगाचा पासपोर्ट वापरला जातो. तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल भारतात नागरिकांचा पासपोर्ट निळा असतो परंतु राजकीय नेत्यांचा पासपोर्ट लाल रंगाचा असतो. सरकारच्या काही प्रतिनिधींचा पासपोर्ट हा सफेद रंगाचा असतो.

4) काळ्या रंगाचा पासपोर्ट- जांबिया, बोत्सवाना, बुरुंडी, अंगोला, गॅबन, कांगो, मलावी अशा आफ्रिकन देशांच्या पासपोर्टचा रंगा काळा असतो. याशिवाय न्युझिलंडच्या नागिरकांकडेही काळ्या रंगाचा पासपोर्ट असतो. कारण इथला राष्ट्रीय रंग काळा आहे.