Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Worli Atria Mall | वरळी भागातील एका मॉलच्या (Worli Atria Mall) रेस्टॉरंटमध्ये हिजाब घातल्याने महिलेला प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर होत असून यामध्ये रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या मित्रांना महिलेचा हिजाब काढण्यास सांगतिल्याच स्पष्ट ऐकायला येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

Worli Atria Mall मधील रेस्टो बार टॅपमधील हा दोन मिनिटांचा व्हिडीओ असून यामध्ये रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या मित्रांना सांगितलं की, तुम्ही महिलेला हिजाब काढण्यास सांगा. तरच आत प्रवेश मिळेल. त्यानंतर लगेचच रेस्टॉरंटचा दुसरा कर्मचारी असं म्हणत आहे की, रेस्टॉरंटमध्ये साड्या नेसून येणाऱ्या महिलांनाही आम्ही परवानगी देत नाही. एवढच नाही तर भारतीय पोशाखांना आम्ही रेस्टॉरंटमध्ये परवानगी देत नाही असंही ऐकू येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटच्या या धोरणाबद्दल नेटिझन्सनी रोष व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर होत आहे.

 

इन्स्टाग्राम यूझर सकिनामाईमूनने हा व्हिडिओ शेअर करताना याबद्दल माथी व्यक्त केलं आहे. ती म्हणाली की, धर्मनिरपेक्ष समाजात असले मूर्ख निर्बंध अजूनही आहेत याचे मला आश्चर्य वाटत. आज, माझ्या मैत्रिणीला एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला कारण तिने रिडा, एक प्रकारचा हिजाब घातला होता आणि ते अयोग्य असल्यामुळे काढून टाकण्यास सांगण्यात आलं. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, असे तिने म्हंटले आहे.

 

Web Title :- Worli Atria Mall | worli atria mall tap resto bar denied entry woman wearing hijab in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’

Shivaji University Recruitment 2021 | कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात लवकरच ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील

Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण