धक्कादायक ! तरुणीकडे पाहून हस्तमैथून करणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरळी परिसरातिल ही घटना आहे. सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र (२५), आनंद कालिप्पन देवेंद्र (३८) अशी या दोघांची नावे असून विनयभंगाच्या गुन्ह्यात वरळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

वरळी परिसरात कामाला असलेली २६ वर्षीय तरुणी शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास कामावरून सुटून घरी परतत होती. तरुणी वरळीच्या लव्ह ग्रोव्ह पंपीग हाऊस येथून जात असताना. हे दोन तरुणही त्या ठिकाणी होते. आपल्याकडे कोणी तरी पाहत आहे असे जाणवल्यावर त्या तरुणीची नजर कंदरस्वामी कडे गेली. त्यावेळी कंदरस्वामीने तरुणीला डोळ्याने आनंदकडे पाहण्यास खुणावले. तरुणीने आनंदकडे पाहिले त्यावेळी आनंद हा तरुणीकडे पाहून हस्तमैथून करत होता. दरम्यान घाबरलेली तरुणी जवळील पालिकेच्या पंप हाऊसच्या सुरक्षा कार्यालयाजवळ गेली. आणि त्याच परिसरात राहणाऱ्या तिच्या मित्राला फोन करून बोलावून घेतले. मित्र आल्यानंतर त्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघांना पकडून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यावेळी वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि. दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले.

मूळचे तामीळनाडूचे रहिवाशी असलेले हे दोन्ही तरुण वरळी परिसरात कामाला आहेत. सध्या पोलिसांनी भा. दं. वि. ३५४(अ), ५०८, ३४ कलमांतर्गत विनयभंगाच्या गुन्हात त्यांना अटक केली आहे.