चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासुन राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुणे शहरातील कोरोनाचे रूग्ण देखील हळू-हळू वाढत आहेत. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 661 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 358 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील तिघांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. सध्या शहरात एकुण कोरोनाचे 201 क्रिटिकल रूग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहरातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 3 हजार 201 एवढी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं शहरातील 4 हजार 834 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 98 हजार 953 वर पोहचली आहे. त्यापैकी 1 लाख 90 हजार 918 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे. सध्या पुणे शहरात रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विना मास्क फिरणार्‍यांवर तसेच संचार निर्बंध असताना विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर पोलिस मोठ्या प्रमाणावर कारवाई करीत आहेत.