चिंताजनक ! पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, गेल्या 24 तासात 760 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या 15 क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. दरम्यान, पुणे शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. काल (दि. 24) कोरोनाचे 743 नवे पॉझिटिव्ह आढळून आले होते तर आज (दि. 25) कोरोनाचे तब्बल 766 नवे पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचे रूग्ण झपाटयानं वाढत असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

 

क्षेत्रीय कार्यालय निहाय तपशील पुढील प्रमाणे – क्षेत्रीय कार्यालयाचे नाव आणि त्यापुढील कंसात दि. 24 आणि दि. 25 रोजी आढळून आलेल्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे.

औंध-बाणेर (दि. 24 रोजी 53 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 46 नवे पॉझिटिव्ह)
भवानी पेठ (दि. 24 रोजी 23 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 36 नवे पॉझिटिव्ह)
बिबवेवाडी (दि. 24 रोजी 44 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 58 नवे पॉझिटिव्ह)
धनकवडी-सहकारनगर (दि. 24 रोजी 72 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 66 नवे पॉझिटिव्ह)
ढोले पाटील रोड (दि. 24 रोजी 30 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 29 नवे पॉझिटिव्ह)
हडपसर-मुंढवा (दि. 24 रोजी 91 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 74 नवे पॉझिटिव्ह)
कसबा-विश्रामबाग (दि. 24 रोजी 61 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 62 नवे पॉझिटिव्ह)
कोंढवा-येवलेवाडी (दि. 24 रोजी 26 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 36 नवे पॉझिटिव्ह)
कोथरूड-बावधन (दि. 24 रोजी 60 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 87 नवे पॉझिटिव्ह)
नगररोड-वडगाव शेरी (दि. 24 रोजी 70 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 63 नवे पॉझिटिव्ह)
शिवाजीनगर-घोलेरोड (दि. 24 रोजी 28 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 27 नवे पॉझिटिव्ह)
सिंहगड रोड (दि. 24 रोजी 57 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 60 नवे पॉझिटिव्ह)
वानवडी-रामटेकडी (दि. 24 रोजी 42 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 25 नवे पॉझिटिव्ह)
वारजे-कर्वेनगर (दि. 24 रोजी 62 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 65 नवे पॉझिटिव्ह)
येरवडा-कळस-धानोरी (दि. 24 रोजी 24 नवे पॉझिटिव्ह तर दि. 25 रोजी 31 नवे पॉझिटिव्ह)

एकुण – (दि. 24 रोजी 743 नवे पॉझिटिव्ह आढळून आले होते तर दि. 25 रोजी 766 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.