डायबिटीजच्या रूग्णांनी अजिबात करू नये ‘या’ 8 गोष्टींचे सेवन, वेगाने वाढेल ब्लड शुगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. काही वस्तू अशा असतात ज्यांचा एक तुकडा जरी डायबिटीज रूग्णांनी खाल्ला तर तो त्यांच्यासाठी विषाचे काम करतो. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या डायबिटीज रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात ते जाणून घेवूयात…

1. फळांचा रस
काही फळांमध्ये जास्त मात्रेत साखर असते. यासाठी डायबिटीजच्या रूग्णांनी केळे, अननस, चेरी किंवा गोड फळांचा ज्यूस सेवन करू नये.

2. द्राक्ष
द्राक्षाचे सेवन करू नका. कारण 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट यात आढळते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलल कंट्रोल राहात नाही.

3. आंबा
एका पिकलेल्या आंब्यात 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. यामुळे ब्लड शुगर वाढते.

4. अननस
पिकलेल्या अननसमध्ये जास्त मात्रेत साखर असते, ज्यामुळे ब्लड शुगर वाढते.

5. व्हाईट ब्रेड
डायबिटीजच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड सेवन करू नये. यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते, शिवाय हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो.

6. चहा
डायबिटीजच्या रूग्णांनी रिकाम्यापोटी चहा पिऊ नये. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.

7. अल्कोहोल
इन्सुलिन घेणार्‍या रूग्णांनी अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे हायपोग्लिसीमियाचा धोका वाढतो.

8. टरबूज
टरबूजचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 असतो, जो खुप जास्त आहे. हे शरीरात जाताच शुगरची मात्रा वाढवते.