वेगाने वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव, इम्यूनिटी कमकुवत करणार्‍या ‘या’ 6 गोष्टींपासून दूर राहा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा वेगाने वाढत आहे. इम्यूनिटी कमजोर असलेल्यांना कोरोनाची लागण ताबडतोब होत आहे. इम्यूनिटी कमजोर असण्याचे सर्वात मोठे कारण तुमचे खाणेपिणे आहे. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांच्या सेवनाने तुमच्या इम्यूनिटीवर वाईट परिणाम होतो, ते जाणून घेवूयात…

1. स्मोकिंग
तुम्ही स्मोकिंग किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा, यामुळे इम्यूनिटी कमजोर होण्यासह अनेक आजार होतात.

2. फास्ट फूड
निरोगी राहण्यासाठी फास्ट फूड सर्वप्रथम सोडा. फास्ट फूडमध्ये शुगर, सोडियम, सॅच्युरेटेड फॅट जास्त असते आणि फायबर जवळपास नसतेच. यामुळे इम्यूनिटी कमजोर होते.

3. सोडा
सोडामध्ये जास्त प्रमाणात शुगर आणि कॅलरी आढळते. कोणतेही न्यूट्रियंस नसतात. ज्यामुळे इम्यूनिटी कमजोर होते, वजन वाढते.

4. आईस्क्रीम
क्रिमी, गोड आणि स्वादिष्ट असलेल्या आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि शुगर असते. ज्यामुळे इम्यून सिस्टम कमजोर होते.

5. सोडियमयुक्त जेवण
सोडियमयुक्त जेवन जसे की फ्रोजन मीट, कॅन सूप, भाजी, चीज पिझ्झा, स्नॅक्स इत्यादी होय. हाय सोडियम फूड सेवन केल्यास ब्लड प्रेशर वाढते. तसेच इम्यून सिस्टमवर वाईट परिणाम होतो.

6. चिप्स
बटाटा किंवा विविध प्रकारचे स्नॅक्स ज्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असते आणि फ्राय केलेले असते त्याचा इम्यून सिस्टमवर वाईट परिणम होतो.