Worst Foods For Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढवतात ‘हे’ 5 फूड्स, आजपासून व्हा दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Worst Foods For Cholesterol | अयोग्य आहार आणि अनहेल्दी लाईफ स्टाईलमुळे आपण असंख्य आजारांना बळी पडतो. बिघडलेल्या आहारामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) वाढू लागते, ज्यामुळे आरोग्याची मोठी हानी होते (Health Care Tips). कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा चरबीसारखा पदार्थ शरीरात लिव्हरद्वारे तयार होतो, ज्याची वाढ आरोग्यासाठी हानिकारक आहे. कोलेस्टेरॉल शरीरात ए, डी, ई आणि के जीवनसत्त्वे शोषण्यास मदत करते (Worst Foods For Cholesterol).

 

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे HDL (हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) जे गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणून ओळखले जाते आणि दुसरे LDL (लो डेन्सिटी लिपो प्रोटीन्स) जे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) म्हणून ओळखले जाते. वाढलेले कोलेस्टेरॉल अनेक आरोग्य धोक्यांचा धोका वाढवते. त्याच्या वाढीमुळे हृदयाला सर्वाधिक धोका असतो.

 

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट फेल्यूअर, हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि स्ट्रोकचा (Heart Failure, Heart Attack, Cardiac Arrest And Stroke) धोका असतो. कोलेस्टेरॉल वाढण्यास चुकीचा आहार आणि खराब जीवनशैली कारणीभूत आहे (Worst Foods For Cholesterol). आहारात काही पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. असे कोणते पदार्थ आहेत जे कोलेस्ट्रॉल वाढवतात ते जाणून घेऊया (Avoid Eating These 5 High Cholesterol Foods In Diet).

 

1. प्रोसेस्ड फूड वाढवते कोलेस्ट्रॉल (Processed Food Raise Cholesterol) :
आहारात प्रोसेस्ड फूड आणि गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. या पदार्थांमध्ये हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवणारी रसायने असतात. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढते (Worst Foods For Cholesterol).

2. मटण टाळा (Avoid Meat) :
कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर मटण टाळा. मटणामध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat) असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास जबाबदार असते. मांस, प्रक्रिया केलेले मांस, लिव्हर आणि डुकराचे मांस या सॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढते.

 

3. फूल फॅट डेअरी प्रॉडक्ट (Full Fat Dairy Products) :
फुल क्रीम दूध, लोणी, दही आणि पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढवण्यास प्रभावी ठरते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कमी चरबीयुक्त दह्याचे सेवन करू शकता, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहील. बटरऐवजी ऑलिव्ह ऑईल आणि अ‍ॅव्होकॅडो ऑईल वापरू शकता.

 

4. तळलेल्या पदार्थांपासून दूर रहा (Stay Away From Fried Foods) :
फ्रेंच फ्राईज, फ्राय चिकन आणि डीप फ्रायरमध्ये शिजवलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते,
तसेच ते ज्या तेलात शिजवले जाते, तेही कोलेस्ट्रॉल वाढवते. तळलेले पदार्थ खाण्याऐवजी, पदार्थांची चव घेण्यासाठी एअर फ्रायर वापरून पहा.

 

5. तणावापासून दूर राहा (Stay Away From Stress) :
तणावामुळे कोलेस्टेरॉल वाढते. जर तुम्ही दीर्घकाळ तणावाखाली असाल तर कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Worst Foods For Cholesterol | avoid eating these 5 high cholesterol foods in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

White Hair Problem | ‘या’ बियांमुळे पांढरे केस पुन्हा होतील काळे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

 

Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या

 

NPS Or EPF Which Is Better | NPS आणि EPF या दोन्ही पैकी रिटायर्मेंट प्लानिंगसाठी काय आहे चांगले