Worst Foods For Heart | हृदयाचे ’शत्रू’ आहेत ‘हे’ 5 फूड्स, हार्ट अटॅकला देतात निमंत्रण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Worst Foods For Heart | निरोगी जीवनासाठी, हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकार हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे आणि त्याचा धोका सातत्याने वाढत आहे. अनहेल्दी (Unhealthy) खाण्याच्या सवयी आणि बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) यामुळे हे होऊ शकते. आधी तुमचे कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढते, मग रक्तदाब वाढतो, मग हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो. असे कोणते पदार्थ आहेत जे हृदयासाठी चांगले नाहीत ते जाणून घेवूया. (Worst Foods For Heart)

 

1. ब्लेंडेड कॉफी (Blended Coffee)
ब्लेंडेड कॉफीमध्ये भरपूर कॅलरी आणि फॅट असते, तसेच त्यातील साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. सर्वाधिक नुकसान कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे होते, जे रक्तदाब वाढवण्याचे काम करते आणि नंतर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येतो. (Worst Foods For Heart)

 

2. इन्स्टंट नूडल्स (Instant Noodles)
इन्स्टंट नूडल्स हे विद्यार्थी आणि सिंगल लोकांचे आवडते फूड आहे, कारण तयार करणे जलद आणि सोपे आहे, परंतु जे नियमितपणे त्याचे सेवन करतात त्यांच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतात. यामध्ये तेल आणि सोडियमचा वापर जास्त होतो, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. (Worst Foods For Heart)

3. फ्रेंच फ्राईज (French Fries)
फ्रेंच फ्राईज खूप गरम तेलात तळले जातात, ज्यामध्ये भरपूर सोडियम, ट्रान्स फॅट्स, कार्ब्ज असतात, ते आरोग्यासाठी खूप धोकादायक मानले जाते, ज्यामुळे कोरोनरी डिसिज होण्याची शक्यता असते.

 

4. पिझ्झा (Pizza)
पिझ्झा हा बहुतांश तरुणांची पहिली पसंती आहे, पण त्यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, यातील चीज कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढवते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर तुम्हाला धोका कमी करायचा असेल तर पिझ्झा तयार करताना संपूर्ण गहू आणि ऑलिव्ह ऑइल वापरा.

 

5. रेड मीट (Red Meat)
रेड मीटमध्ये भरपूर सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ असते, त्यामुळे असे मांस महिन्यातून एकदाच खाण्याचा सल्ला दिला जातो.
जरी ते प्रोटीनची गरज पूर्ण करते, परंतु अतिरिक्त चरबी कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Worst Foods For Heart | worst foods for heart pizza red meat instant noodles french fries blended coffee world heart day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

RBI Hike Repo Rate | सणासुदीपूर्वी RBI चा पुन्हा झटका, रेपो रेट 0.50 टक्के वाढला, कर्ज महागले

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, शिंदेंचे नेतृत्व माना…अन्यथा तुमची शिवसेना…