हिंजवडीत १२ लाखाचा गुटखा जप्त

हिंडवडी : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध रित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पोमधून ११ लाख ७५ हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी सोमवारी (दि.२६) केली. या कारवाईत पोलिसांनी २४ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय 30), पंकज दत्तात्रय तुरेकर (वय 27, दोघे रा. मगरआळी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध रित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. तपासणी दरम्यान दोन टेम्पोमध्ये गुटख्याची पोती आढळून आली. यामध्ये ११ लाख ७५ हजार रुपयाचा गुटखा जप्त केला.  हिंजवडी पोलिसांनी याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिली असून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढमाले, पोलीस हवालदार कीरण पवार पोलीस नाईक अतिक शेख, कुनाल शिंदे, विकी कदम, पोलीस शिपाई चव्हाण यांच्या पथकाने केली.