2014 मध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचे निर्णय किती जबाबदार ?, प्रणब मुखर्जींनी पुस्तकात सांगितले

नवी दिल्ली : काँग्रेसमधील एका अशा व्यक्तीचे नवीन पुस्तक बाजारात येणार आहे, ज्यास काँग्रेसची सर्व रहस्य माहित होती. हे पुस्तक युपीएचा उत्कर्ष आणि पतन याचे अनेक खुलासे करणार आहे, ज्यावरून वाद-विवाद सुद्धा होऊ शकतात. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांचे हे पुस्तक मागील वर्षांमध्ये काँग्रेसच्या सातत्याने होणार्‍या निवडणूक परावभांमध्ये लीडरशिपच्या भूमिकांची सुद्धा पडताळणी करू शकते.

सोनियांनी मनमोहन सिंहांना निवडल्याने दुखावले प्रणब
The Presidential Years नावाचे हे पुस्तक जानेवारी महिन्यात येईल. पुस्तकात इतर गोष्टींशिवाय काँग्रेसमध्ये पंतपधान पदाच्या दावेदारीच्या वादाशी संबंधित गोष्टी सुद्धा असणार आहेत. सोनिया गांधी यांनी विश्वासू म्हणून मनमोहन सिंह यांची निवड केल्याने प्रणब मुखर्जी दुखावले होते, यामुळेच आपण पुढे येऊ शकलो नाही, असे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवले आहे.

आणखी एक गोष्ट मुखर्जी यांना त्रासदायक वाटत होती, ती म्हणजे त्यांना एका अशा पंतप्रधानाला रिपोर्ट करावा लागत होता, ज्याच्याकडे त्यांच्यापेक्षा कमी राजकीय अनुभव होता. मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये वादाच्या बातम्या सुद्धा येत असत.

पक्षाच्या अनेक नेत्यांचे मत प्रणब यांच्या बाजूने
यातून प्रश्न हा सुद्धा समोर येतो की, काँग्रेसचे काही नेते आणि सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या घोटाळ्यांच्या सत्रानंतर मनमोहन सिंह सरकारची प्रतिमा मलिन झाल्यानंतर सुद्धा पीएम न बदलून काँग्रेसने चूकी केली होती का? प्रणब मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

काही काँग्रेस सदस्यांनी थेअरी बनवली होती की, जर मी 2004 मध्ये पीएम बनलो असतो तर कदाचित 2014 चा दारूण पराभ टाळता येऊ शकला असता. मात्र, मी या दृष्टिकोनाशी सहमत नाही. मला वाटते की, मी राष्ट्रपती झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने आपला फोकस गमावला होता. सोनिया गांधी पक्षाची प्रकरणे हाताळण्यासाठी सक्षम नव्हत्या, तर डॉ. सिंह यांच्या लोकसभेतील मोठ्या गैरहजेरीमुळे खासदारांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता.

तर झाला नसता 2014 चा दारूण पराभव
यूपीए 2 च्या वाईट काळाची सुरूवात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने केली होती. तेव्हा प्रणब मुखर्जी आंदोलनकर्त्यांशी चर्चेच्या बाजूने नव्हते, परंतु त्यांना यामध्ये सहभागी व्हावे लागले होते, कारण मनमोहन सिंह आणि त्यांचे सल्लागार नर्व्हस होते.

पक्षाची प्रतिमा खराब होत होती. परंतु, कोणत्याही काँग्रेस नेत्याद्वारे पीएम बदलण्याची सूचना सोनिया गांधींकडून टाळली जात होती. 2014 च्या निवडणुकीच्या निकालांनी त्या नेत्यांच्या सूचना योग्य सुद्धा ठरवल्या होत्या, ज्यांना वाटत होते की प्रणब पीएम व्हावेत.