WPL 2023 GJ vs MI | मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुजरातला मोठा धक्का; ‘हि’ अष्टपैलू खेळाडू टीममधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – WPL 2023 GJ vs MI | महिला प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेला 4 मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघामध्ये होणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याच्या अगोदर गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजची स्टार अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिच्या जागी आता ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू किम गर्थची वर्णी लागली आहे. गुजरात जायंट्सने लिलावात डिआंड्रा डॉटिनला 60 लाख रुपयांना विकत घेतले होते. (WPL 2023 GJ vs MI)
गर्थ गेल्या महिन्यात अनसोल्ड राहिली होती
मागच्या महिन्यात महिला आयपीएलचा लिलाव पार पडला होता. या लिलावात कोणत्याच संघाने किम गर्थवर बोली लावली नव्हती त्यामुळे ती अनसोल्ड राहिली होती. हा लिलाव जेव्हा पार पडला तेव्हा किम गर्थ दक्षिण आफ्रिकेत टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होती. गर्थने या विश्वचषकापूर्वी केवळ दोन सराव सामने खेळले होते.
या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघामध्ये होणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी गुजरात जायंट्सच्या संघाचे नेतृत्व करणार आहे तर अष्टपैलू हरमनप्रीत कौर हि मुंबईच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. हा सामना सुरु होण्याच्या अगोदर डीवाय पाटील स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सुप्रसिद्ध गायक एपी ढिल्लन हे डब्ल्यूपीएल 2023 गाणे सादर करताना दिसणार आहेत. (WPL 2023 GJ vs MI)
गुजरात जायंट्स संघ पुढीलप्रमाणे
बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ,
सबिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा गाला,
अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबमन शकील.
Web Title :- WPL 2023 GJ vs MI | deandra dottin out of the wpl 2023 and gujarat giants have picked kim garth as their replacement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | चोरीला गेलेले दागिने महिलेला केले परत, कोंढवा पोलिसांची कामगिरी