WPL 2023 | स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मावर मोठी जबाबदारी; युपी वॉरियर्झच्या उपकर्णधारपदी नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाईन : WPL 2023 | यंदाच्या वर्षी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आयपीएलचे नियोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने हे आयोजन केले आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठीचा मोठा लिलाव पार पडला. या लिलावात भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आली. या स्पर्धेला 4 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असल्याने सर्व संघ आपआपली संघबांधणी करत आहे. तसेच आपल्या संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार देखील जाहीर करत आहेत. स्पर्धेतील पाच पैकी तीन संघांनी आपले कर्णधार जाहीर केले आहेत. बाकी दोन संघ लवकरच आपले कर्णधार जाहीर करतील. युपी वॉरियर्झ संघाने नुकतीच कर्णधारासह आपल्या उपकर्णधाराच्या नावाची देखील घोषणा केली. भारतीय संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा हिच्याकडे युपी वॉरियर्झच्या संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर यष्टीरक्षक एलिसा हिलाची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. (WPL 2023)

दीप्ती शर्मावर तब्बल 2 कोटी 60 लाखांची लागली बोली
युपी संघाने बऱ्याच खेळाडूंवर पैसे खर्च केले. यामध्ये त्यांनी तब्बल 2 कोटी 60 लाख अशी मोठी रक्कम देऊन दीप्ती शर्माला आपल्या संघात दाखल करून घेतले. युपीस्थित क्रिकेटर असणारी दीप्ती हि युपीच्या संघाकडून डॉमेस्टिक क्रिकेट खेळते. आता आयपीएलमध्येही ती युपी संघाचे नेतृत्व करत असताना संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. (WPL 2023)

WPL 2023 साठी युपी वॉरियर्झचा संघ पुढीलप्रमाणे
सोफी एक्लस्टन, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), तहलिया मॅकग्रा, शबनम इस्माइल, एलिसा हिली (कर्णधार),
अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्ववी चोपडा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस,
देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.

Web Title :-  WPL 2023 | indian allrounder deepti sharma to be vice captain of up warriorz in wpl 2023