WPL 2023 Schedule | 4 मार्चपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; 5 संघांमध्ये पार पडणार चुरस

पोलीसनामा ऑनलाईन : महिला आयपीएलच्या (WPL 2023 Schedule) पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मुकेश अंबानींचा मुंबई आणि गौतम अदानीचा अहमदाबाद संघ यांच्यात पार पडणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात येणार आहे. हे सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तसेच हे सामने डबल हेडरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई आणि अहमदाबाद संघांमध्ये शनिवार 4 मार्च रोजी होणार आहे. देशातील दोन मोठ्या उद्योगपतींच्या संघामध्ये हा सामना पार पडणार आहे. एकीकडे मुंबई संघाचे मालक मुकेश अंबानी आहे, तर दुसरीकडे अहमदाबाद संघाचे मालक गौतम अदानी आहेत. (WPL 2023 Schedule)

कशाप्रकारे होणार सामने?
गट टप्प्यातील सामन्यांनंतर जो संघ गुणतालिकेत जो संघ टॉपला असेल तो संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये एलिमिनेटर सामना पार पडेल यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. या स्पर्धेतील 4थ्या व 5 व्या स्थानावरील संघ बाहेर पडतील. या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 5 दिवस असे असतील, जेव्हा कोणतेही सामने होणार नाहीत. 17 ते 18 मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत. ग्रुप स्टेजचे सर्व सामने खेळल्यानंतर संघाना 2 दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे. 24 मार्च रोजी एलिमेंटरचा सामना पार पडेल तर 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.

महिला प्रीमियर लीग 2023 चे संघ – (WPL 2023 Schedule)

1- अहमदाबाद महिला आयपीएल संघ
मालक: अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 1289 कोटी

2- मुंबई महिला आयपीएल संघ
मालक: इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 912.99 कोटी

3- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आयपीएल संघ
मालक: रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 901 कोटी

4- दिल्ली महिला आयपीएल संघ
मालक: जेएसडब्लयू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 810 कोटी

5- लखनऊ महिला आयपीएल संघ
मालक: कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 757 कोटी

Web Title :- WPL 2023 Schedule | the first match of the wpl 2023 tournament will be between gautam adani and mukesh ambani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri-Chinchwad Crime | किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण, तीन जणांना अटक; चाकण परिसरातील घटना

Gadar 2 | ‘गदर 2’ चित्रपटातील ॲक्शन सीन लीक, Video आला समोर

Nawazuddin Siddiqui | अभिनेता नवाजुद्दीनच्या अडचणींमध्ये वाढ; पत्नीच्या आरोपांनंतर कोर्टाने बजावली नोटीस