WPL 2023 | आज पार पडणार महिला IPL चा दुसरा सामना; दिल्ली विरुद्ध RCB ? कोण कोणावर पडणार भारी?

पोलीसनामा ऑनलाईन : WPL 2023 | काल ४ मार्चपासून महिला IPL ला सुरुवात झाली आहे. काल या स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जाएंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जाएंट्सवर 143 धावांनी विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात हा सामना पार पडणार आहे. (WPL 2023)

स्मृती मानधना हि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे तर ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू मेग लॅनिंग हि दिल्ली कॅपिटलचे कर्णधापद सांभाळणार आहे. हे दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्न करतील. मागच्या महिन्यात पार पडलेल्या लिलावात RCB संघाने 3.40 कोटी विक्रमी बोली लावून स्मृती मानधनाला आपल्या संघात घेतले होते तर दिल्ली कॅपिटलने मेग लॅनिंग हिच्यावर 1.1 कोटी बोली लावून आपल्या संघात दाखल करून घेतले होते. (WPL 2023)

कधी अन कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामना आज मुंबईतील बेब्रॉन स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना ठीक दुपारी 3:30 वाजता होणार आहे. सामन्याच्या अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होणार आहे.

कुठे पाहाल सामना?
महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने स्पोर्ट्स 18 चॅनेलवर दाखवण्यात येणार आहेत.
यासोबत या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण Jio Cinema वर होणार आहे.

Web Title :- WPL 2023 | wpl 2023 royal challengers vs delhi capital match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण