WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ह्या वर्षांपासून महिलांची आयपीएल (WPL Title Sponsor) खेळवण्यात येणार आहे. नुकताच या महिलांच्या आयपीएलचा लिलाव पार पडला. आता डब्ल्यूपीएलला टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. टाटा समूह, भारतातील एक प्रसिद्ध व्यवसाय समूहाने, डब्ल्यूपीएलचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार मिळवले आहेत. मंगळवारी बीसीसीआय आणि टाटा यांच्यात टायटल स्पॉन्सरशिपबाबत (WPL Title Sponsor) एक करार पार पडला. हा करार नेमका किती कोटींचा आहे याबाबत अजून कोणता खुलासा करण्यात आला नाही.

 

टाटांनी गेल्या वर्षी आयपीएलचे हक्कही विकत घेतले होते. 2022 मध्ये, टाटा चीनी मोबाईल कंपनी विवोच्या जागी आयपीएलचे टायटल प्रायोजक बनले. टाटा डब्ल्यूपीएल टायटल प्रायोजक बनल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विटरवरून दिली आहे. “मला हे घोषित करताना अत्यंत आनंद होत आहे की, टाटा समूह पहिल्या डब्ल्यूपीएलचे टायटल प्रायोजक असेल. त्यांच्या पाठिंब्याने आम्ही महिला क्रिकेटला पुढच्या स्तरावर नेऊ शकतो, असा विश्वास आहे.” असे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

 

 

 

4 मार्चपासून महिलांच्या आयपीएलला होणार सुरुवात

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामाला ४ मार्चपासून सुरुवात होणार असून 26 मार्चला अंतिम सामना पार पडणार आहे. या आयपीएलसाठी पार पडलेल्या लिलावात 87 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. तिला आरसीबीने 3 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतले. (WPL Title Sponsor)

 

महिला आयपीएलमधील भारताच्या सर्वात महागड्या खेळाडू-

या लिलावामध्ये दहा भारतीय क्रिकेटपटूंना एक कोटी रुपये किंवा त्यावरील रकमेची बोली लागली. यामध्ये स्मृती मनधाना (3.4 कोटी), दीप्ती शर्मा (2.6 कोटी), जेमायमा रॉड्रिग्ज (2.2 कोटी), शफाली वर्मा (2 कोटी), पूजा वस्त्रकार (1.9 कोटी), रिचा घोष (1.9 कोटी), हरमनप्रीत कौर (1.8 कोटी), यास्तिका भाटिया (1.5 कोटी), रेणुका सिंग (1.5 कोटी), देविका वैद्य (1.4 कोटी) यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंबरोबरपरदेशी महिला खेळाडूदेखील मालामाल झाल्या आहेत.

 

कशाप्रकारे होणार सामने?

गट टप्प्यातील सामन्यांनंतर जो संघ गुणतालिकेत जो संघ टॉपला असेल तो संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये एलिमिनेटर सामना पार पडेल यामध्ये
जो संघ विजय होईल तो संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे.
या स्पर्धेतील 4थ्या व 5 व्या स्थानावरील संघ बाहेर पडतील. या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये 5 दिवस असे असतील, जेव्हा कोणतेही सामने होणार नाहीत.
17 ते 18 मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत.
ग्रुप स्टेजचे सर्व सामने खेळल्यानंतर संघाना 2 दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे.
24 मार्च रोजी एलिमेंटरचा सामना पार पडेल तर 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.

 

Web Title :- WPL Title Sponsor | after ipl tata became the title sponsor of wpl as well deal with bcci for five years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा