WPL2023 | मुंबई इंडियन्स लागले तयारीला; झुलन गोस्वामीसह ‘या’ 3 खेळाडूंवर सोपवली महत्वाची जबाबदारी

0
1410
WPL2023 | mumbai indians announces coaching team for women s premier league
file photo

पोलीसनामा ऑनलाईन टीम – WPL2023 | महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मुकेश अंबानींचा मुंबई आणि गौतम अदानीचा अहमदाबाद संघ यांच्यात पार पडणार आहे. महिला आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात येणार आहे. हे सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तसेच हे सामने डबल हेडरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई आणि अहमदाबाद संघांमध्ये शनिवार 4 मार्च रोजी होणार आहे. (WPL2023)

यानंतर आता पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचाइजीने तयारी सुरू केली असून त्यांनी आपल्या टीमच्या प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. यात इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लट एडवर्ड्स आणि झुलन गोस्वामी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी झुलन गोस्वामीवर देण्यात आली आहे. तर मुख्य प्रशिक्षकपदी इंग्लंडची माजी कॅप्टन शार्लट एडवर्ड्स हिची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून देविका पळशीकरची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघाच्या व्यवस्थापकाची भूमिका बजावणार आहे. मुंबई इंडियन्सने अधिकृत ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. (WPL2023)

 

महिला आयपीएलचे कशाप्रकारे होणार सामने?
गट टप्प्यातील सामन्यांनंतर जो संघ गुणतालिकेत जो संघ टॉपला असेल तो संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघामध्ये एलिमिनेटर सामना पार पडेल यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. या स्पर्धेतील 4थ्या व 5 व्या स्थानावरील संघ बाहेर पडतील. या स्पर्धेत एकूण 22 सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 5 दिवस असे असतील, जेव्हा कोणतेही सामने होणार नाहीत. 17 ते 18 मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत. ग्रुप स्टेजचे सर्व सामने खेळल्यानंतर संघाना 2 दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे. 24 मार्च रोजी एलिमेंटरचा सामना पार पडेल तर 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.

महिला प्रीमियर लीग 2023 चे संघ –
1- अहमदाबाद महिला आयपीएल संघ
मालक: अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 1289 कोटी

2- मुंबई महिला आयपीएल संघ
मालक: इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 912.99 कोटी

3- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आयपीएल संघ
मालक: रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 901 कोटी

4- दिल्ली महिला आयपीएल संघ
मालक: जेएसडब्लयू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 810 कोटी

5- लखनऊ महिला आयपीएल संघ
मालक: कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
किंमत: 757 कोटी

 

Web Title :- WPL2023 | mumbai indians announces coaching team for women s premier league

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sunil Kedar | सत्यजीत तांबे प्रकरणात नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार का? काँग्रेस नेते स्पष्टचं बोलले; म्हणाले…

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी