तरुणाला बेदम मारहाण करणारे पुण्यातील 5 ‘पैलवान’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीसमोर अचानक आलेल्या तरुणाला पाच पैलवानांनी भररस्त्यात बेदम मारहाण केली. पैलवानांनी केलेल्या मारहाणीत तरुम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पैलवानांच्या भररस्त्यातील या कुस्तीनंतर पोलिसांनी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात राहणाऱ्या पाच पैलवानांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.२३) रात्री सव्वा अकराच्या सुमारास भारती विद्यापीठ येथील त्रिमुर्ती चौकात घडला.

विनायक अनंता वाल्हेकर (वय २१), ओंकार राजेंद्र खाटपे (वय २१), सुमित पोपट मरगजे (वय २३), शुभम श्रीधर गव्हाणे (वय २३), अभिषेक खाटपे या पैलवानांना अटक करण्यात आली असून, त्यांचे साथिदार अक्षय शिंदे, अजिंक्य जायगुडे (सर्व रा. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, भारती विद्यापीठ पुणे) हे दोघे पसार झाले आहेत. तर याप्रकरणी शिरिष किशोर राऊत (वय १८, रा. भारती विद्यापीठ पुणे) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हा भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमुर्ती चौकातून शुक्रवारी (२३ ऑगस्ट) रात्री दुचाकीवरून जात होता. यावेळी अटक करण्यात आलेले पैलवानापैकी काहीजण त्या परिसरातून जात होते. यावेळी राऊत याची दुचाकी अचानक या पैलवांनांच्या समोर आली. यावरून वाद झाल्यावर पैलवानांनी संकुलातून अन्य पैलवांना बोलावून घेत राऊत याला बेदम मारहाण केली. यामध्ये राऊत हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी राऊत याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पाच पैलवांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले या तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –