कुस्तीपटू बबिता फोगट ‘या’ पैलवान बरोबर होणार विवाहबद्ध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुस्तीपटू बबिता फोगटने जीवनसाथीची निवड केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर करून बबिताने म्हंटले की, तुम्हाला माहितीच आहे की माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सगळं काही जाहिर झालं आहे, आता वेळ आली आहे की, दिलवाला अब अपनी दुल्हनिया ले जाए. बबिताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे विवेक सुहाग.

विवेक सुहाग हा पैलवान आहे तसेच विवेक भारत केसरीचा विजेता आहे. २०१८ साली विवेकने भारत केसरी पुरस्कार जिंकला होता. बबिताचे वडील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी हे नातं पक्क केले आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बबिता आणि विवेक विवाहबद्ध होतील.

बबिता फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. बबिताची मोठी बहीण गीता फोगट ही देशाला कॉमनवेल्थ गेममध्ये कुस्ती या प्रकारात गोल्ड मेडल मिळवून देणारी पहिली महिला आहे. तिने पैलवान पवन कुमार सोबत लग्न केले.

गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर दंगल हा चित्रपट आला होता. या चित्रपटात गीता फोगटची भूमिका फातिमा सना शेखने केली होती तर बबिताची भूमिका सान्या मल्होत्राने केली होती. या बहिणींच्या वडिलांची भूमिका अभिनेता आमिर खान याने केली होती.