पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Wrestler Vikram Parkhi | जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याने तीस वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला. या घटनेने कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैलवान विक्रम पारखी (वय ३०) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव आहे.
ते मुळशी तालुक्यातील माण येथे राहण्यास होते.
बुधवारी सकाळी ते माण येथे असणाऱ्या जिममध्ये व्यायामासाठी गेले होते.
तेथे व्यायाम करत असताना त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पारखी यांनी गाजवली होती अनेक कुस्ती मैदाने
पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावून मुळशीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.
वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व करत पदके मिळवली होती.
तसेच अनेक कुस्ती मैदाने गाजवत मानाच्या गदा मिळवल्या होत्या.
त्यांच्या निधनाने माण गावावर तसेच पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पैलवान, वस्ताद कुस्तीशौकीन हळहळ व्यक्त करत आहे.
माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#