विधान परिषदेत कुस्ती क्षेत्रातील मान्यवरास संधी मिळावी : मुंबई महापौर केसरी आबा काळे

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या विधान परिषदेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना संधी मिळते परंतु कुस्ती क्षेत्रातील एखाद्या नामांकितास कधी संधी मिळणार कारण राज्याला कुस्तीची मोठी दैदिप्यमान परंपरा आहे आणि अशा क्षेत्रातून एखादा आमदार म्हणून असावा अशी मागणी मुंबई महापौर केसरी आबा काळे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात अनेकविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अनेक रत्नं जन्माला आली यात साहित्य, कला, क्रीडा, एन. जी. ओ यांचा समावेश होतो. यापैकी कला साहित्य क्षेत्रातील अनेक जण विधान परिषदेवर नियुक्त आमदार झाले परंतु कुस्ती क्षेत्रातील असा एखादा प्रतिनिधी असावा कारण या क्षेत्रात आपले करियर करताना आपले सर्वस्व पणाला लावून मेहनत घेत असतात. ही पहेलवानांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात अधीक आहे. अनेक आखाड्यामधून कुस्तीचे डावपेच शिकून मानांकनासाठी धडपड चालू असते. यात राज्य शासनाची मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी साठी तयारी केली जाते.

या क्षेत्रात या तरुणांना अनेक समस्या असतात त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपला एक प्रतिनिधी आमदार असला पाहिजे अशी आग्रही मागणी मुंबई महापौर केसरी आबा काळे यांनी केली आहे. याला या क्षेत्रातील अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

You might also like