ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे निधन

बेंगलुरु : वृत्तसंस्था – प्रख्यात नाटककार, साहित्यिक, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाड यांच्यावर उपचार सुरु होते. बेंगलुरु येथील राहत्या घरी त्यांचे आज सकाळी निधन झाले. कन्नडबरोबरच मराठी नाटक, चित्रपटात काम केले. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युटचे संचालक म्हणून त्यांनी भरीव काम केले होते. कलावंताबरोबरच एक विचारवंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला होता. कोणाची तमा न बाळगता ते आपल्याला वाटणा गोष्ट, भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडत असत.

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.

नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत.
गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेले व गाजलेले चित्रपट

उत्सव (हिंदी)
उंबरठा (मराठी)
ओंदनोंदू कालादल्ली (कानडी)
कनक पुरंदर (कानडी)
काडू (कानडी)
कानुरू हेग्गदिती (कानडी)
गोधुलि (हिंदी)
तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
निशांत (मराठी)
वंशवृक्ष (कानडी)

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

अग्नी मत्तू मळे (कानडी भाषेत)
टिपू सुलतान (मराठी भाषेत)
तलेदंड (कानडी)
तुघलक (मराठी)
नागमंडल (मराठी)
ययाती (मराठी)
हयवदन (मराठी)
गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
कालिदास सन्मान पुरस्कार
तन्वीर सन्मान पुरस्कार (२०१२)
नागमंडलसाठी कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२)
पद्मभूषण (१९९२)
पद्मश्री (१९७४)

भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट कनक पुरंदरसाठी सुवर्ण कमल (१९८९)
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे संचालकपद (१९७४-७५)
‘वंशवृक्ष’साठी उत्तम दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार(१९७२)
‘संस्कार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक (१९७०)
संगीत नाटक अकादमीचा नाट्यलेखनासाठी पुरस्कार (१९७२)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४)
होमी भाभा फेलोशिप (१९७०-७२)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)

गिरीश कर्नाड यांनी ‘आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ‘घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर प्रसिद्ध झाले आहे़

आरोग्यविषयक वृत्त –

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

‘हे’ घरगुती उपाय केल्यास नाभी इन्फेक्शन होऊ शकते दूर

नेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

Loading...
You might also like