लेखिका आणि समाजसेविका सुजाता पठारे-साळवी साहित्य आणि सामाजिक कार्यासाठी भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – नवोदीत लेखिका आणि समाजसेविका सुजाता पठारे-साळवी यांना साहित्य आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल बेटी फाउंडेशन, वणी यांच्या वतीने नुकताच भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२० देऊन गौरविण्यात आले. बेटी फाउंडेशन, वणी यांनी शिक्षण, सामाजिक, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात अपवादात्मक काम केल्याबद्दल पुरुष आणि महिलांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्रातील वणी येथील प्रिन्स लॉन्स याठिकाणी आयोजित सोहळ्यात १०० पैकी केवळ ५१ अर्जांची निवड झाली.

प्रख्यात लेखिका आणि समाजसेविका सुजाता पठारे-साळवी यांनी तिच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तिला समाज हितासाठी साहित्य आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारत भूषण या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. .

आजच्या जीवनाची बदलती गती अचुकप्रकारे सुजाता आपल्या लेखांमध्ये मांडत आहे. गतिशील दृष्टीकोनातून तिने कल्पनारम्य, नॉनफिक्शन, नाटक आणि साहित्यातून अनुभवता आले. तिच्या लेखनाला एक भावनिक स्पर्श आहे आणि तिच्या लेखनशैलीमुळे तिने अनेक वाचकांच्या मनात घर केले आहे. तसेच, लॉकडाऊन दरम्यान, शासनाच्या नियमांमुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते कारण लोकांना त्यांच्याकडून थेट माल खरेदी करता येत नव्हता. त्यांच्याकडे भाजीपाला थेट विकण्याचा पर्याय नव्हता. सुजाता यांनी अशा शेतक-यांची भेट घेतली आणि त्यांचा माल विकण्यासाठी वेब अ‍ॅप्लिकेशन विकसित केले. या माध्यमातून ती 300 कुटुंबांशी संपर्क साधू शकली आणि याचा चांगलाच फायदा झाला. शेतकर्‍यांच्या आनंद आणि समाधानाची पातळी अत्यंत होती. सामाजिक जबाबदारी म्हणून सुजाता यांनी हे पाऊल उचलत समाजहिताचे कार्य केले.

लेखक आणि सामाजिक सेविका सुजाता पठारे-साळवी म्हणाल्या, मला भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे कधीच वाटले नव्हते किंवा त्या उद्देशाने मी काम केले नाही. या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो आणि मला माझ्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद झाला आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत समाज हितासाठी काम करण्याचे वचन दिले आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणू इच्छित आहे.