Writer Gita Vishwanath | गीता विश्वनाथ यांच्या ‘अ जर्नी गॉन राँग’ कादंबरीचे प्रकाशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्शल बुक कॅफे, औंध (Marshall Book Cafe, Aundh) आणि विश्वकर्मा प्रकाशन (Vishwakarma Publications) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ट्वाईस इट हॅपन्ड’च्या (Twice it Happened) लेखिका गीता विश्वनाथ (Writer Gita Vishwanath) यांच्या ‘अ जर्नी गॉन राँग’ (A Journey Gone Wrong) या दुसऱ्या कादंबरीचा (Novel) प्रकाशन व अभिवाचन सोहळा शुक्रवारी (दि.11) समारंभपूर्वक पार पडला. बाल तथा कुमारवयीन साहित्य निर्मितीकार दीपक दलाल (Deepak Dalal) आणि विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी (Vishal Sony) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन (Book Publication) करण्यात आले. लेखिका गीता विश्वनाथ (Writer Gita Vishwanath) यांचा सत्कार त्यांचे पुणे विद्यापीठातील (Pune University) तत्कालीन वर्गमित्र व समर्थ पोलीस स्टेशनचे (Samarth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane) यांच्या हस्ते करण्यात आला.

 

जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीतील (Lockdown) एकांतात या कादंबरीचे लेखन गीता विश्वनाथ (Writer Gita Vishwanath) यांनी केले. त्यांच्या कथा आणि त्यातील पात्रे वास्तव जीवनातील घटना आणि व्यक्तींच्या त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांवर आधारित असल्याने टाळेबंदीमुळे काही काळ एकमेकांपासून दुरावलेल्या किंवा अति जवळीक अनुभवलेल्या कुटुंबांच्या कल्पनेतून या कादंबरीचे कथानक आकार घेत जाते. एकमेकांपासून काही काळ दूर राहिलेल्या एका छोट्या परिवाराच्या कौटुंबिक मूल्यांना (Family Values) अनपेक्षित घटनांमुळे बसलेला धक्का आणि त्यातून सावरण्याचा प्रत्येक पात्राने आपापल्या परीने केलेला प्रयत्न याचे सुंदर रेखाटन या कादंबरीत पाहायला मिळते.

दीपक दलाल यांनी निदर्शनास आणून दिलेल्या कादंबरीतील वास्तववादी (Realistic) चित्राबद्दल बोलताना गीता विश्वनाथ म्हणाल्या की, त्यांच्या दोन्ही कादंबरीतील गजुलुपूर हे काल्पनिक गाव कोलार जिल्ह्य़ातील (Kolar District) त्यांचे आजोळ गोवनीपल्लीवर बेतलेले आहे. त्यांनी बालपणीच्या काही आठवणींना उजाळा यावेळी दिला. आपल्या लिखाणाच्या सवयींबद्दल बोलताना गीता विश्वनाथ म्हणाल्या की, लेखनासाठी खूप शिस्तबद्धता लागते. त्यामुळे रोज एका ठराविक वेळी कमीत कमी एक ते दोन पाने लेखन करण्याचा त्यांचा नियम सातत्याने पाळल्याने कधीकधी लेखक म्हणून येणारा कोरेपणा त्यांना सहज दूर करता येतो. हा कोरेपणा अगदीच वेळेचा अपव्यय नसतो. कारण अशावेळी लेखक आसपासच्या गोष्टींचे निरीक्षण, त्यांवर चिंतनही करीत असतो. या निरीक्षणांतील कुठली गोष्ट कोणत्या ठिकाणी लिखाणात उपयोगी पडेल सांगता येत नाही.

 

यावेळी कादंबरीतील काही भागाचे वाचन झाले. तसेच वाचकांनी त्यांचे अभिप्राय देखील नमूद केले. यामध्ये पूना कॉलेजचे (Poona College) इंग्रजीचे माजी प्राध्यापक डॉ मुज़फ्फर सलीम (Former Professor Dr. Muzaffar Salim) यांनी त्यांना आवडलेल्या उताऱ्यांचे वाचन करून पाळीव प्राण्यांच्या प्रेमातून माणूस अधिक चांगला माणूस बनू शकतो या कथेतील एका पात्राच्या विचाराशी सहमती व्यक्त केली.

 

जयंत दासगुप्ता (Jayant Dasgupta) यांनी कादंबरीची नायिका रोहिणीचे त्यांना जाणवलेले विश्लेषण सादर केले.
गीता विश्वनाथ यांच्याशी पुणे विद्यापीठातील विद्यार्थीदशेपासून मैत्री असलेल्या डॉ. जीनत खान (Dr. Zeenat Khan) यांनीही कादंबरीबद्दल आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित डॉ. तेजश्री रानडे (Dr. Tejashree Ranade) व सुचेता सिद्धा (Sucheta Siddha)
या दोन कलाकार प्रेक्षकांनी गीता विश्वनाथ आणि दीपक दलाल यांची सुंदर रेखाचित्रे काढली.
सर्वेश गोसावी (Sarvesh Gosavi) यांनी प्रास्ताविक केले.
ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त करून विश्वकर्मा प्रकाशनच्या नूपुर जैन (Nupur Jain) यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

Web Title :- Writer Gita Vishwanath | Publication of Geeta Vishwanath’s novel ‘A Journey Gone Wrong’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

 

Punit Balan Group | तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे १७ मार्च पासून आयोजन

 

Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल