स्वरा भास्करचा Ex बॉयफ्रेंड हिमांशु सोबत ‘रायटर’ कनिका ढिल्लननं केला साखरपुडा !

पोलीसनामा ऑनलाइन – रायटर कनिका ढिल्लन (Kanika Dhillon) हिनं रायटर हिमांशु शर्मा (Himanshu Sharma) सोबत साखरपुडा केला आहे. दोघांनीही बॉलिवूडमधील अनेक पॉप्युलर सिनेमे लिहिले आहेत. एका प्रायव्हेट सेरेमनीत दोघांचा साखरपुडा झाला आहे. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायस्वरा भास्करचा Ex बॉयफ्रेंड हिमांशु सोबत ‘रायटर’ कनिका ढिल्लननं केला साखरपुडा ! | writer kanika dhillon engaged pics social media
रल होताना दिसत आहेत.

‘कनिका-हिमांशु’नं केला साखरपुडा

कनिकानं तिच्या इंस्टावरून साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत ती येलो कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हिमांशुनं ब्लू कुर्ता पायजमा आणि व्हाईट जॅकेट घातलं आहे. फोटो शेअर करताना कनिकानं खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

कनिका आणि हिमांशु यांनी 1 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमांशुला डेट करण्याआधी फिल्ममेकर प्रकाश कोवलामुडी सोबत तिचं लग्न झालं होतं. 2019 मध्ये दोघं वेगळे झाले. हिमांशु देखील अ‍ॅक्ट्रेस स्वरा भास्कर सोबत रिलेशनमध्ये होता. परंतु त्यांनीही नात्याला पूर्णविराम दिला आणि वेगळे झाले.

हिमांशु आणि कनिकानं लिहिले ‘हे’ सिनेमे

हिमांशुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि रांझणा असे सिनेमे लिहिले आहेत.

कनिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनुराग कश्यपचा सिनेमा मननर्जियां लिहिला आहे. याशिवाय केदारनाथ, जजमेंटल है क्या, गिल्टी असे सिनेमेही तिनं लिहिले आहेत. तापसी पन्नूचा आगामी सिनेमा हसीन दिलरुबा हाही तिनं लिहिला आहे.