अरूण जेटली आणि रघुराम राजन यांच्यामुळे भारतात आर्थिक ‘मंदी’ : भाजप खा. सुब्रमण्यम स्वामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चूकीच्या धोरणामुळे भारताची अर्थव्यवस्था मंदावली आहे असे म्हणत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, अरुण जेटली अर्थमंत्री असताना अर्थव्यवस्थेसंबंधित अनेक चूकीचे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे मंदी निर्माण झाली. आजही तीच धोरणे राबवण्यात येत आहेत.

रघुराम राजन यांच्यामुळे भारतात मंदी
यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांच्यावर देखील निशाणा साधला. राजन यांनी त्यांच्या कार्यकाळात वाढवलेल्या व्याजदराचा परिणाम आज अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. त्यांच्या काळात वाढलेले व्याजदर हे मंदीला जबाबदार असल्याची टीका देखील त्यांच्याकडून करण्यात आली.

अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारने कलम ३७० रद्द करताना माझे मत विचारात घेतले होते. मात्र अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी माझे कोणतेही मत विचारात घेतले नाही. अर्थव्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. राजकीय निर्णय आणि आर्थिक धोरण दोन्ही राष्ट्रबांधणीसाठी आवश्यक आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३१९व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like