मला पश्चाताप नाही, तो निर्णय भारतीय संघाच्या भल्यासाठीच 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यातून मिताली राजला संघातून वगळण्यात आल्याच्या  निर्णयावरुन आता वाद निर्माण झाला आहे. भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरवर चहुबाजुने टीका होतअसतानाच  मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने अत्यंत कठोर शब्दात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका केली आहे. मात्र भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने हा या निर्णयाचा पश्चाताप नसल्याचे सांगितले.
एका ट्वीटमधून मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने हरमनप्रीतचा समाचार घेत तिला अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख म्हटलंय. अनीशाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, भारतीय टीम खेळावर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते हे दुर्देवी आहे. भारत विरूद्ध आयरलॅंड सामन्यात मिताली राजचा अनुभव किती कामी आला हे माहित असूनही हरमनप्रीत जी अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख आहे, तिला खुश करण्यासाठी मितालीने तिला तिच्या मनासारख करू दिलं. एका वेगळ्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं जे अकाऊंट काही वेळात डिलीट करण्यात आलं.
हा ट्वीट तु केलायस का ? असा प्रश्न ‘ईएसपीएनक्रिकइंफो’ वेबसाईटने अनीशाला केला. तेव्हा ती आपल्या वक्तव्यावर कायम राहिलेली दिसली.   इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ते टि्वटच आपणच केल्याचे तिने सांगितले. आता सामन्यांचे थेट प्रक्षेपण होते. त्यामुळे कोण प्रदर्शन करतो आणि कोण नाही करत ते आपल्याला दिसेलच असे तिने सांगितले.
‘मिताली राजला बाहेर ठेवल्याचा पश्चाताप नाही –  हरमनप्रीत कौर
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने हा या निर्णयाचा पश्चाताप नसल्याचे सांगितले.  ती म्हणाली ‘आम्ही जो काही निर्णय घेतला होता तो संघाचे हित पाहूनच घेतला होता. काही निर्णय योग्य ठरतात तर काही निर्णय योग्य ठरत नाहीत. पण, या निर्णयाचा पश्चाताप नाही.’ याचबरोबर हरमनप्रीतने संघातील खेळाडूंचे कौतुक केले. ती म्हणाली ‘आमच्या मुलींनी या स्पर्धेत कौतुकास पात्र कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण आमचा संघ यंग आहे.’ हरमप्रीतने भारतीय संघ अजुनही यंग असल्याने या संघाला आपली मानसिक ताकद वाढवण्यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात मितालीने सहा हजार धावांचा विक्रम केला. विशेष म्हणजे या विक्रमासोबतच सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू आहे.