WTC Final | इंदूर कसोटीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारत आणि ऑस्ट्रेलिया (WTC Final) यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकत 9 विकेट्सनी भारताचा पराभव केला. या विजयासह टीम ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट (WTC Final) चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 68.52 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर टीम इंडिया 60.29 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील पहिले 2 सामने मोठ्या फरकाने जिंकले पण तरीदेखील त्यांना WTC फायनलमध्ये अजून एंट्री मिळालेली नाही. जर भारताने शेवटचा सामना जिंकला तर तो सहज WTC फायनलमध्ये प्रवेश करेल पण भारताने जर हा सामना गमावला तर भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेचा पराभव केला तर भारत थेट फायनलमध्ये धडक मारेल. (WTC Final)
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास भारताचा पहिला डाव 33.2 षटकांत 109 धावांवर संपुष्टात आला.
यानंतर प्रत्युत्तरसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाने सर्वबाद 197 धावा केल्या.
यानंतर भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात केली पण त्यामध्ये पण भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या.
त्यामुळे टीम ऑस्ट्रेलियाला 76 धावाचं माफक लक्ष्य मिळाले.
यानंतर टीम ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड (नाबाद 49) आणि लाबुशेन (नाबाद 28) यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मालिकेतील आपले आव्हान टिकवून ठेवले आहे.
Web Title :- WTC Final | ind vs aus test australia wins 3rd test enters in wtc final 2023
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update