WTC | WTC फायनलमधून ‘हा’ संघ पडला बाहेर; भारतासमोर ‘या’ बलाढ्य संघांचे आहे आव्हान

पोलीसनामा ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हि वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने अधिक महत्त्वाची होती. भारताने यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताचे फायनलमध्ये जाण्याचे आव्हान अधिक सोप्पे झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सलग दुसऱ्या विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पात्र होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.

दिल्लीत दुसऱ्या कसोटीत झालेल्या विजयमामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीतील संघ चारवरून आता तीनवर आले आहेत. दक्षिण आफ्रिका या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता टॉप-2 मध्ये जागा मिळवण्यासाठी भारताला आव्हान देणारा एकच संघ या शर्यतीत आहे तो म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेचा संघ 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेला पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि त्यांना जर टॉप-2 मध्ये यायचं असेल तर दोन्ही कसोटी जिंकणे आवश्यक असणार आहे.

ऑस्ट्रेलिया सध्या 66.67 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत आता 64.06 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्या 53.33 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेला टॉप-2 मध्ये जर जागा मिळवायची असेल तर त्यांच्या आगामी दोन्ही कसोटी जिंकणे गरजेचे असणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील 2 सामने अजून बाकी आहेत. टीम इंडियाला या स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर त्यांना इंदूर कसोटीमध्ये विजय मिळवावा लागेल. तर त्यांनी या कसोटीमध्ये विजय मिळवला तर ते आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचतील.

ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीतून बाहेर पडू शकणार?
हि कसोटी भारताबरोबर ऑस्ट्रेलियासाठी देखील महत्वाची असणार आहे.
भारताने जर ही मालिका 4-0 अशा फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसू शकतो.
गुणतालिकेत त्यांचे पॉईंट्स कमी होत ते खाली घसरू शकतात आणि त्यांना अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी श्रीलंका-न्यूझीलंड मधील कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.
यादरम्यान कसोटीमध्ये श्रीलंकेने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीच्या रेसमधून
बाहेर पडेल आणि फायनल भारत आणि श्रीलंका यांच्यात होईल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनमध्ये ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टॉप-५ संघ
ऑस्ट्रेलिया – 66.67%
भारत – 64.06%
श्रीलंका – 55.33%
दक्षिण आफ्रिका – 48.72%
इंग्लंड -46.97%

Web Title :- WTC | wtc final scenario sa is ruled out of the final race as team india defeat australia in delhi test match know the details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | अलिशान चारचाकीसाठी विवाहितेचा खून, चिखली परिसरातील घटना; सासरच्या मंडळींवर FIR