WWE ची ग्लॅमरस रेसलर ‘शार्लोट’नं शेअर केला ‘नो मेकअप’ लुक, ‘ट्रोल’ झाल्यावर म्हणाली…

 पोलीसनामा ऑनलाईन टीम – WWE महिला रेसलर शार्लोट फ्लेअर (Charlotte Flair) हिनं आपल्या दोस्तांसोबत बिना मेकअपचं फोटोशुट केलं होतं. यामुळं ती बुलिंगची शिकार झाली.

अमेरिकन WWE महिला रेसलर शार्लोट हिनं तिच्या इंस्टारवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती बिना मेकअप दिसत आहे. यामुळं शार्लोट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. ट्रोलर्सना तिचा हा अंदाज आवडला नाही असं दिसत आहे. शार्लोटला आशा होती की, लोकांना तिचा हा ओरिजनल फोटो आवडेल परंतु असं काहीच झालं नाही. एरवी शार्लोट तिचे ग्लॅमरस आणि बिकीनी फोटोच चाहत्यांसोबत शेअर करत आली आहे.

अनेक ट्रोलर्सनी तिच्या या नो मेकअप लुकची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तिला वाईट साईट बोललं आहे. भरपूर टीका झाल्यानंतर तिनं ट्रोलर्सना जोरदार उत्तर देखील दिलं आहे. शार्लोटनं लिहिलं की, “मी आधीच सांगितलं आहे की, मी एखाद्या पुरुषाप्रमाणे दिसते. मी वाईट दिसते माझं शरीर खूप गुळगुळीत आहे. परंतु हे खरं आहे की, मला पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास जाणवतो. मी स्वत:ला खूप सुंदर आणि मजबूत मानते.”