लहानपणी आईचे कपडे घालून पहात होता ‘हा’ WWE रेसलर, आता झाला ट्रान्सजेंडर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपल्या फाईट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या टायलर रेक्सने नुकताच खुलासा केला आहे की तो ट्रान्सजेंडर आहे आणि आता गॅबी टुफ्टच्या नावाने ओळखला जाईल. गॅबीने आपल्या दिर्घ इंस्टाग्राम पोस्टमध्ये ट्रान्सजेंडर झाल्याचे सांगितले आहे. तो 2009 पासून 2014 पर्यंत रेसलिंगमध्ये अ‍ॅक्टिव्ह होता.

गॅबीने एक प्रेस रिलिज जारी केली होती आणि यामध्ये लिहिले होते की, माजी डब्ल्यूडब्ल्यूई स्टार ते बॉडी बिल्डर, फिटनेस गुरु, मोटिव्हेशनल स्पीकर आणि मोटरसायकल रेसर ते आता तो एका सुंदर महिलेपर्यंतचा प्रवास पूर्ण करत आहे. एक चांगले रेसलिंग करियर आणि अनेक रेसलर्सशी रिंगमध्ये फाइट करणार्‍या टायलरच्या मनात अनेक वर्षांपासून एक अंतर्गत लढाई सुरू होती, ज्यावर तो आता जिंकला आहे.

2014 मध्ये गॅबीने आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी रेसलिंग सोडले होते. तो फिटनेस गुरु आणि मोटिव्हेशनल स्पीकर सुद्धा आहे. गॅबीने म्हटले की, त्याच्यासाठी हे सोपे नव्हते आणि मागील आठ महिने त्याच्या जीवनातील सर्वात अवघड महिने होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मला याबाबत खुप तणाव असायचा की, मी याबाबत जगाला कसे सांगू शकतो, परंतु ज्या दिवशी मी लोकांचा विचार करणे सोडून दिले, त्या दिवशी मी पूर्णपणे स्वतंत्र झालो.

रेसलरने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, जेव्हा तो 10 वर्षाचा होता तेव्हा तो आपल्या आईचे ड्रेस घालून पहात होता. परंतु तो आपल्या पर्सनॅलिटीच्या या भागाबाबत लोकांशी कधीही बोलत नसे. गॅबीने या प्रकरणात आपल्या पत्नीचा मोठा आधार असल्याचे सांगितले. त्यांनी 2002 मध्ये विवाह केला होता आणि दोघांना 9 वर्षांची एक मुलगी आहे. गॅबीचे म्हणणे आहे की, तो आपल्या पत्नीशी सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह नाही आणि ते सध्या एक्सप्लोअर करत आहेत.

या प्रेस रिलीजच्या शेवटी लिहिले आहे की, ही एक अशी गोष्ट आहे जी रेसलिंग आणि इतर स्पोर्ट्स फॅन्स, फ्रेंड्स, फॉलोअर्सला मिस केली नाही पाहिजे, विशेषकरून एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये राहणार्‍या लोकांना. जे कुणी लोक या आव्हानात्मक ट्रान्सजेंडर मुद्द्याशी झगडत असतील तर गॅबी आणि त्याची पत्नी प्रिस्चीला नेहमी मदतीसाठी तयार आहेत.