WWE ‘रेसलर’ निक्की बेलानं शेअर केला ऐश्वर्या रॉयसोबतचा फोटो ! म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन –WWE मधील प्रसिद्ध जुडवा रेसलर सिस्टर्स निक्की बेला आणि ब्री बेला एकाच वेळी प्रेग्नंट राहिल्यानं काही दिवसांपूर्वीच चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा एकदा या दोघी चर्चेत आल्या आहेत याचं कारण म्हणजे त्यांचा एक थ्रोबॅक फोटो आहे. खास बात अशी या फोटो निक्की आणि ब्री सोबत बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय देखील दिसत आहे.

निक्की बेलाननं बहिण ब्रीसोबतचा 2007 सालचा मुंबई दौऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत निक्की, ब्री आण ऐश्वर्या रॉय दिसत आहे. एका वक्र ट्रीपदरम्यान त्यांची ऐश्वर्यासोबत भेट झाली होती. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B_NP8rhFK6I/

ऐश्वर्या सोबत एक जाहिरात शुट करण्यासाठी निक्की आणि ब्री दोघी बहिणी मुंबईत आल्या होत्या. निक्कीनं या दरम्यानचे काही फोटो आता इंस्टावरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं होतं.

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये निक्की म्हणते, “ए फ्लॅशबॅक टू 2007. जेव्हा ब्री आणि ऐश्वर्यासोबत सोबत शुट करण्यासाठी 11 दिवसांसाठी मुंबईला आलो होतो.” पोस्टमध्ये तिनं भारतीय संस्कृती, इथलं जेवण याच्या प्रेमात पडल्याचंही सांगितलं.

https://www.instagram.com/p/B-Dp838FCBo/