‘हे’ जण 10 आहेत जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार, कमाई ऐकून डोळे ‘विस्फटतील’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुमच्यापैकी बहुतेक जणांना डब्लूडब्लूइ (World Wrestling Entertainment) हा शो आवडत असेलच. कारण जगातली आणि आपल्या भारतातील कितीतरी तरुण मंडळी या शोचे मोठे चाहते आहेत. आम्ही आज आपल्याला शोमधील सर्वात श्रीमंत सुपरस्टार आणि त्यांची एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत सुपरस्टारची कमाई एकूण तुम्ही नक्कीच थक्क व्हाल याची खात्री आहे. या यादीमध्ये आपण जगातील सर्वात श्रीमंत १० सुपस्टार आणि त्यांच्या संपत्ती बद्दल जाणून घेणार आहोत.

१.  माईक फोलेय –  चार वेळा जागतिक जेतेपद आणि ११ वेळा वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियन असलेल्या फोलेय यांची कमाई ११ कोटी ५३ लाख ९५,९७९ रुपये इतकी आहे.

२.  ख्रिस जेरिको –  कॅनडाचा सर्वात प्रसिद्ध रेसलर जेरिकोनं २००१ मध्ये दी रॉक, ट्रिपल एच आणि स्टोन कोल्ड स्टी ऑस्टीन यांना पराभूत करत धमाका उडवला होता. त्याची कमाई १३३ कोटी ७४ लाख ३०,२०० रुपये इतकी आहे.

३.  बिग शो-  WCW, WWE, World Heavyweight आणि ECW World titles जिंकणारा एकमेव खेळाडू असलेला बिग शो १४९ कोटी १६ लाख ६०,६१९ रुपये कमावतो.

४.  ब्रॉक लेसनर –  आपल्या वयाच्या २५ व्या वर्षी WWE Champion (२००२) बनणार युवा खेळाडू ब्रॉक लेसनर ‘बीस्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची १८२ कोटी ८८ लाख ४०,२५६ रुपये इतकी कमाई आहे.

५.  कर्ट अँगल-  चारवेळा WWF/WWE Championship जेतेपद, एकदा WCW Championshipआणि एकदा World Heavyweight Championship अशी जेतेपद कर्ट अँगलच्या नावावरती आहे. तो १८२ कोटी ८८ लाख ४०,२५८ रुपये कमावतो.

६.  हल्क हॉगन –  या खेळाडूच्या नावावरती १२ World Champion जेतेपद आहेत. त्यात सहा WWF World Heavyweight Champion/WWF Champion आणि सहा WCW World Heavyweight Champion जेतेपद आहेत. त्याची कमाई १९२ कोटी ५४ लाख ९१,१५७ रुपये आहे.

७.  ट्रिपल एच-  त्याने २५ championships जिंकली असून, त्यात ९ WWF/WWE Champion आणि ५ WWE’s World Heavyweight Champion जेतेपदाचा समावेश आहे. तो ३०१ कोटी २१ लाख २२,८६१ रुपये कमावतो.

८.  स्टोन कोल्ड स्टी ऑस्टिन–  तो ३३८ कोटी ७२ लाख ६०,३९४ कमाई करतो.

९.  जॉन सीना-  ४१३ कोटी ६० लाख ८४,४३० रुपये कमावतो.

१०.  दी रॉक (ड्वेन जॉन्सन)-  तो १९२३ कोटी ६९ लाख १३,७६२ कमाई करतो.