5 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंतचं कर्ज, ‘या’ कंपनीची ‘बंपर’ ऑफर, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतातील आपल्या ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय दिला आहे. आता एमआय क्रेडिट सर्विसच्या माध्यमातून ग्राहकांना फक्त 10 मिनिटात 1 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज दर महिन्याला हप्तांमध्ये फेडता येईल. शाओमीने इंस्टंट लोन कंपनी KrazyBee बरोबर भागीदारी केली आहे. एमआय क्रेडिटसाठी आदित्य बिर्ला कॅपिटल पर्सनल फायनान्स, मनी व्ह्यू, अर्लीसॅलरी, क्रेडिटविद्या आणि झेस्टमनी हे कर्ज देणारे भागीदार आहेत. कंपनीचा दावा आहे की कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास 5 मिनिटांचा कालावधी लागेल. तसेच ही प्रकिया शंभर टक्के डिजिटल असणार आहे. तसेच वापरकर्ते अ‍ॅपवरुन विनामूल्य क्रेडिट स्कोअर पाहू शकतात.

असा करा अर्ज
सर्वात आधी वापरकर्त्यांना प्ले स्टोअरमधून क्रेडिट अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. अ‍ॅपला आवश्यक परवानग्या दिल्यानंतर गेट नाऊ बटणावर क्लिक करा. त्यात फोननंबर टाकून लॉग इन करा. त्यात सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर पॅन कार्डचा फोटो, नाव, लिंग आणि जन्मतारीखेची माहिती अपलोड करावी लागेल. त्यात वापरकर्त्यांनी अ‍ॅड्रेस प्रुफ आणि सेल्फी अडलोड करावा लागेल. कंपनीच्या पात्रतेनुसार किती कर्ज दिले जातं आहे याची माहिती स्क्रीनवर येईल. कंपनी वैयक्तिक कर्जावर दर महिन्याला 1.35 व्याज घेते. हे कर्ज ग्राहक 91 दिवस ते 3 वर्षांसाठी कालावधीत फेडू शकतात.

डेटा प्रायव्हेसीची चिंता 
शाओमीच्या डेटा प्राव्हसीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कंपनीने आपल्या माध्यमातून नवी कर्ज प्रणाली लॉन्च केली आहे. यात फक्त फोनवरुन एक प्रोफाइल बनवायचं आणि तात्काळ कर्ज तुम्हाला उपलब्ध होईल. ज्यावेळी आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने केले जातात त्याचवेळी उपस्थित होतो डेटा संरक्षणाचा प्रश्न. परंतू ग्राहकांच्या सर्व डेटाची पूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. शाओमीने सांगितले की हा डेटा एन्क्रिप्डेट स्वरुपात जमा करण्यात येईल.

Visit : policenama.com