‘शाओमी’ची Leap Day 2020 ‘ऑफर’ : आज करु शकतात फक्त 29 रुपयांपासून ‘शॉपिंग’, मिळेल 92 % पर्यंत मोठी ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेब्रुवारी महिन्यात 4 वर्षानंतर येणाऱ्या 29 फेब्रुवारी या खास तारखेला शाओमीने एक खास ऑफर सादर केली आहे. ज्यात लिहिले आहे, शॉपिंग करण्यासाठी आणखी एक एक्स्ट्रा दिवस. शाओमीने या दिवशी ग्राहकांना काही खास ऑफर उपलब्ध करुन दिली आहे, ज्यात तुम्ही फक्त 29 रुपयांपासून वस्तु खरेदी करु शकतात. एवढेच नाही तर आज शाओमीच्या वस्तुंवर किमान 29 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात आली आहे.

या सेलमध्ये Mi Beard Trimmer 1,499 रुपयांना नाही तर फक्त 1,029 रुपयांनी खरेदी करता येणार. Mi Home सिक्योरिटी Camera Basic 1080p देखील 2299 रुपयात नाही तर फक्त 1,429 रुपयात खरेदी करु शकतात.

Mi Bluetooth Speaker देखील 1,49 रुपयांनी उपलब्ध करुन दिला आहे. Mi LED 129 रुपयांत उपलब्ध असेल. Mi I love Mi T-Shirt Black वर देखील कंपनीने मोठी सूट दिली आहे. हा टी शर्ट 799 रुपयांऐवजी 329 रुपयात उपलब्ध करुन दिला आहे.

Redmi Go case White वर 92 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ही केस 349 रुपयांना आहे परंतु सेलमध्ये फक्त 29 रुपयांनी खरेदी करता येईल. याशिवाय Redmi 6 च्या सॉफ्ट केस ब्लॅक वर 92 टक्के सूट आहे त्यामुळे हे फक्त 29 रुपयात तुम्ही विकत घेऊ शकतात. याशिवाय ICICI Credit कार्डद्वारे खरेदी केल्यास त्यावर 5 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.