खुशखबर ! फक्‍त अवघ्या पाच रुपयांत खरेदी करा ‘टीव्ही’ आणि ‘मोबाईल’, जाणून घ्या ५% की ५ रुपयात

मुंबई : भारतात मोबाईलसाठी अल्पावधीत प्रसिद्ध झालेली चिनी कंपनी शाओमीने धमाकेदार ऑफर आणली आहे. शाओमीला भारतात येऊन पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त शाओमीने एका सेलची घोषणा केली असून हा सेल २३ जुलै ते २५ जुलै या कालावधीत सुरु असणार आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये ग्राहकांना अवघ्या पाच रुपयांत मोबाईल, टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे वाचल्यावर ग्राहकांना यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.

पाच रुपयांत रेडमी नोट ७ प्रो
शाओमीचा हा पाच रुपयांचा फ्लॅश सेल २३ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत फक्त दोन तास असणार आहे. या सेलमध्ये रेडमी नोट ७ प्रो हा मोबाइल पाच रुपयांत खरेदी करता येणार आहे. ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंट असलेला मोबाइल ५ रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनची बाजारपेठेत १५ हजार ९९९ रुपये किंमत आहे. तर, २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तुम्हाला रेडमी वाय३ हा मोबाइल खरेदी करण्याची संधी आहे. ३ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या वेरिएंट मोबाइलची बाजारपेठेत किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.

त्याशिवाय, २३ जुलै सायंकाळी ४ वाजता २० इंचाचा एमआय लगेज ब्लू अवघ्या पाच रुपयात खरेदी करता येणार आहे. पाच रुपयांच्या सेलमध्ये १०० युनिट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर, त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता शाओमीचा ३२ इंचाचा एम एलईडी टीव्ही ४ए प्रो पाच रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारपेठेत या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे.

त्याशिवाय, २४ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंतच्या सेलमध्ये रेडमी गो स्मार्टफोन आणि १० हजार एमएएच क्षमता असलेली पॉवर बँक ६९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. याची खरी किंमत ५१९८ रुपये आहे. तर, २० इंचाच्या एमआय लगेज आणि एमआय बॅण्ड एचआरएक्स तुम्हाला अवघ्या १२९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात याची किंमत ४२९८ रुपये आहे. या ऑफरमध्ये एमआय कॅज्यु्अल बॅकपॅक आणि बेसिक इअरफोन ३४९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.

टीप या फ्लॅश सेल मध्ये मुळ रखमेच्या ५% डिसकाऊंट हा सर्वांनाच मिळणार आहे तर, ‘फ्लॅश’ लकी ठरणाऱ्याला फक्त ५ रुपयात मोबाईल मिळणार आहे.