दिवाळी धमाका ! एका रूपयामध्ये स्मार्टफोन घेण्याची सुवर्णसंधी, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सणासुदीच्या मुहूर्तावर शाओमी कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Diwali with Mi नावाचा धमाकेदार असा सेल आणला आहे. १६ ते २१ ऑक्टोबर दररोज दुपारी ४ वाजता या फ्लॅश सेलच आयोजन करण्यात आलं आहे. हा सेल शाओमी कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळावर व फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध होईल. या सेल मध्ये ग्राहकांना फक्त एक रुपयांत स्मार्ट फोन खरेदी करता येणार आहे.

शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, Diwali with Mi या सेल मध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. एक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदा बँकेचे क्रेडिट कार्ड असणाऱ्यांना एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये अनेक उपकरणांवर ८० टक्के सवलत मिळेल. त्यात Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅक सारख्या प्रॉडक्टचा समावेश आहे. सेल दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत PICK N’ CHOOSE डील्स सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

तद्वतच सेल मध्ये Redmi Note 9 Pro Max , Redmi Note 8 , Redmi 9 Prime , Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro या स्मार्ट फोनवर एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. Redmi 8A dual वर २०० रुपयांची सूट मिळेल. व नुकताच रिलीज झालेला ५४,९९९ रुपयांचा Mi 10 हा स्मार्टफोन ४४,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोन व्यतिरिक्त अन्य स्मार्ट प्रॉडक्टवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. Mi Smart Band 4 वर ३०० रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. त्यानंतर Mi Smart Band 4 ची किंमत १९९९ इतकी झाली आहे. Mi TV 4A Pro (43) वर ५०० रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. तर TV 4X (50) वर १०० रुपयांची सूट देण्यात आली आहे.