MI चा Wireless Headphones भारतात होणार लॉन्च ; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi आपल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भारतामध्ये अनेक प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्यात कंपनी Redmi K20 सीरिजचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. या बरोबरच Xiaomi Redmi 7A हा स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे.

१५ जुलैला Xiaomi भारतमध्ये वायरलेस हेडफोन लाँच करणार आहे. नुकतेच Xiaomi ने Mi Beard Trimmer सुद्धा भारतामध्ये लॉन्च केले आहे. इ कॉमर्स वेबसाईट Amazon India च्या लिस्टिंग नुसार Amazon Prime Days च्या निमित्ताने येथे Xiaomi चे हेडफोन्स देखील मिळतील. Amazon Prime Days ची सुरवात १५ जुलैला होणार आहे.

या महिन्यात कंपनी Redmi K20 सीरीज आणि हेडफोन्स सोबत फास्ट चार्जर तसेच Mi LED लैंप सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्याच्या ४ जुलैला Xiaomi भारतात स्मार्टफोन Redmi 7A लाँच करेल.

Xiaomi च्या या Headphones ची काय वैशिष्ट्य आहेत याची कोणतीही माहिती देनाय्त आलेली नाही. Amazon लिस्टिंग ने दिलेल्या माहितीनुसार Xiaomi च्या या Wireless Earphones ला बेस लव्हर्ससाठी बनविण्यात आले आहे. ये इंप्रुव्हड रेंजसोबत फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी देखील देते.

You might also like