Video : नवी चार्जिंग टेक्नोलॉजी ! केबलची गरजच नाही, चालता फिरता एकावेळी अनेक डिव्हाईस होणार चार्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी तंत्रज्ञान कंपनी (Chinese technology company) शाओमीने शुक्रवारी एक नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी लाँच केली आहे. कंपनीने याला एमआय एअर चार्ज असं नाव दिलं आहे. हे नवीन तंत्रज्ञान सध्याच्या वायरलेस चार्जिंग पद्धतीहून वेगळी आहे. Mi Air Charge तंत्रज्ञानाद्वारे युजर्स लांबून कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला चार्ज करू शकतील. या तंत्रज्ञानाने विना वायर, गेम खेळताना, चालतानाही एकावेळी अनेक डिव्हाईस चार्ज केले जाऊ शकतील.

सध्या शाओमीची ही नवी चार्जिंग टेक्नोलॉजी सिंगल डिव्हाईसला ७ मीटरच्या रेंजमध्ये ५ व्हॅट रिमोट चार्जिंग देण्यास सक्षम आहे. त्याशिवाय एकाचवेळी अनेक डिव्हाईस चार्ज केली जाऊ शकतात. प्रत्येक डिव्हाईसला ५ व्हॅटचा सपोर्ट मिळेल. येणाऱ्या काळात या चार्जिंग टेक्नोलॉजीने वॉच, ब्रेसलेट आणि इतर वियरेबल डिव्हाईसही चार्ज केले जाऊ शकतात.

शाओमीने (Xioami) एका ब्लॉगपोस्टद्वारे या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या टेक्नोलॉजीद्वारे कोणत्याही डिव्हाईसला दूरवरुनच चार्ज केलं जाऊ शकेल. यात कोणत्याही केबल किंवा वायरलेस चार्जिंग स्टँडची गरज नाही. हे ट्रू वायरलेस चार्जिंग सिस्टम असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. ही चार्जिंग पद्धत जागेची स्थिती (Space positioning) आणि निर्जीव प्रेषण आधारित (Inanimate pressure based) आहे. शाओमीने स्वत: डेव्हलप केलेल्या आयसोलेटेड चार्जिंग पाईलमध्ये इन-बिल्ट ५ फेज इंटरफेस अँटिना आहे, जो स्मार्टफोनच्या लोकेशनचा ठिकाण बरोबर सांगतो. १४४ अँटिनाने बनलेला एक फेज कंट्रोल एरे मिलीमीटर-वाईड वेव्सला बीमफॉर्मिंगद्वारे थेट फोनमध्ये प्रसारित करतो.

शाओमीने बिल्ट-इन बीकन अँटिना आणि रिसिव्हिंग अँटिना एरेसह एक छोटा अँटिनाही डेव्हलप केला आहे. बीकन अँटिना Low power कंजप्शनसह पोजिशन इंर्फोर्मेशन ब्रॉडकास्ट करतो. त्याचप्रमाणे १४४ अँटिनाने बनलेला रिसिव्हिंग अँटिना एरे चार्जिंग पाईलद्वारा एमिट केलेले मिलीमीटर वेव सिग्नलला रेक्टिफायर सर्किटद्वारे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. अशाप्रकारे हे चार्जिंग सिस्टम काम करतं.