कोपर्डी प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून यादव पाटील यांची नियुक्ती

अहमदनगर: पोलिस ऑनलाईन –  राज्यभर चर्चेत आलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासह खून प्रकरणातूल तीनही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँडव्होकेट उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीसाचाच भाऊ निघाला चोर, ‘असा’ अडकला पोलीसांच्या जाळ्यात 

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आणि मराठा क्रांती मोर्च्यांमुळे देशभर गाजलेल्या कोपर्डी खून खटल्यातील तिन्ही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरुद्ध आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोषी ठरविणाऱ्या आदेशाच्या विरुद्ध अपील दाखल केले आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकारने फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी कॉन्फिर्मशन अर्ज दाखल केला आहे. सदर दोन्ही प्रकरणी प्राथमिक सुनावणी सुरू झाली आहे
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर जिल्हा पोलिस प्रशासनाने ख्यातनाम फौजदारी वकील  उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यासंबंधीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविला होता.त्यास अनुसरून,विधी व न्याय विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. ऍड यादव-पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या निष्णात अभ्यासाचा फायदा होऊन आरोपींना कठोर शासन होईल, अशी भावना पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त करण्यात आली.
यादव पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. राज्यात गाजलेल्या जवखेडे तिहेरी हत्यांकाडात विशेष सरकारी म्हणून ते काम पाहतात.