यड्राव हत्याकांड : तिच्या प्रसंगावधानाने वाचले तीन जीव

शिरोळ : पोलीसनामा ऑनलाईन

काळ अंगात संचारलेल्या प्रदीप विश्वनाथ जगताप या जावयाने शनिवारी पहाटे यड्राव (ता. शिरोळ) या सासूरवाडीत मृत्यूही लाजावा, असे हत्याकांड घडविले. पत्नी, सासूसह मेहुणा व विवाहित मेहुणीला संपविताना तीन कुटुंबांची वाताहत केली. सर्वांनाच संपविण्याचा त्याचा प्रयत्न होता. आई, आजीला पिसाळलेला सावत्र बाप मारत असल्याचे पाहून चिमुकल्या सान्वीने लहान भाऊ गणेशला हाताशी धरले. जवळच झोपलेल्या सहा महिन्यांच्या श्रीधरला उचलून घेत अंधारातच उसाच्या फडाचा आसरा घेतला. तिच्या प्रसंगावधानामुळेच तीन जीव बचावले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adeeee0b-cab8-11e8-982c-c1018a357143′]

कौटुंबिक वादातून शनिवारी पहाटे प्रदीपने यड्राव येथे पत्नी रूपाली प्रदीप जगताप (वय २७), सासू छाया श्रीपती आयरेकर (५५), मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर (१७) व मेहुणी सोनाली अभिजित रावण (२४) यांची यंत्रमागाच्या लाकडी माराने हल्ला करून हत्या केली.

प्रदीप व रूपाली या उभयतांचा हा दुसरा विवाह होता. रूपालीच्या पहिल्या पतीची मुलगी सान्वी (वय ११) ही यड्राव येथे आईजवळच राहत होती. डोळ्यासमोर सावत्र बापाच्या डोळ्यात संचारलेला मृत्यू पाहून तिने लहान भाऊ गणेशसह सोनालीचा सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर याला उचलून घेऊन शेतात धूम ठोकली. त्यांनाही संपविण्याचा प्रदीपचा विचार होता. घाबरलेली सान्वी सकाळीच दोन्ही मुलांसह उसातून बाहेर पडली. आयरेकर यांचे संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा प्रदीपचा डाव होता. सान्वीच्या प्रसंगावधानामुळे तीन चिमुकले जीव बचावले.

[amazon_link asins=’8193427696′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8257041-cab8-11e8-a65a-2b1d4bab5d61′]

याशिवाय प्रदीपचा दुसरा मेहुणा अभिषेक कामास गेला असल्यामुळे बचावला. यड्राव येथे सासूरवाडीत चौघांची हत्या केल्यानंतर दुसरा मेहुणा अभिषेक ज्या कारखान्यात कामास आहे, तेथे जाऊन प्रदीपने त्यास बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला; पण तो कारखान्यातून बाहेर न आल्यानेच बचावला.

दोन वर्षांपूर्वी सोनालीचा विवाह म्हैसाळ (ता. मिरज) येथील अभिजित रावण याच्याशी झाला होता. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली सोनाली व सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर यांना रविवारी अभिजित म्हैसाळ येथे घेऊन येणार होता; पण एका रात्रीत  सोनालीवर काळाने घाला घातला, हे सांगताना अभिजितला अश्रू अनावर झाले होते.

सांगलीत ‘स्वाईन’ने महिलेचा मृत्यू

खुनाच्या प्रकरणात मातृछत्र गमावलेल्या श्रीधर रावण या सहा महिन्यांच्या बालकास त्याचे वडील अभिजित रावण (रा. म्हैसाळ, ता. मिरज) यांनी ताब्यात घेतले, तर सान्वी (वय ११) व गणेश (४) या बहीण-भावाला त्यांचे चुलत मामा रूपेश आयरेकर (रा. शिवाजीनगर, निपाणी) यांनी निपाणीला नेले.

मृतांच्या नातेवाइकांनी चौघांच्या पार्थिवांवर इचलकरंजीत पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. संशयित प्रदीप जगताप यास शहापूर पोलिसांनी रविवारी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

[amazon_link asins=’B074VFTPKH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b0ea647-cabb-11e8-9703-b11f5fbb22a8′]